
मुंबई : दिनांक ०९.०९.२०१८ ते १६.०९.२०१८ दरम्यान वांद्रे येथे भरणाऱ्या माउंटमेरी जत्रेला होणारी सांभाव्य गर्दी लक्षात घेऊन , दरवर्षीप्रमाणे बेस्ट उपक्रमातर्फे याही वर्षी जत्रेसाठी येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीकरिता मुंबईतील विविध भागातून तसेच वांद्रे बसस्थानक(पश्चिम) ते हिलरोड (मेहबूब स्टुडिओ) दरम्यान जादा बसगाड्या चालविण्यात येणार आहेत.
जादा बसगाड्यांची माहिती :
१) रविवार दिनांक ०९.०९.२०१८, सकाळी २५ ,संध्याकाळी २३.
२) सोमवार दिनांक १०.०९.२०१८,सकाळी १२,संध्याकाळी १२.
३) मंगळवार दिनांक ११.०९.२०१८,सकाळी १२,संध्याकाळी १२.
४) बुधवार दिनांक १२.०९.२०१८,सकाळी १७, संध्याकाळी २१.
५) गुरुवार दिनांक १३.०९.२०१८,सकाळी १२,संध्याकाळी १२.
६) शुक्रवार दिनांक १४.०९.२०१८,सकाळी १७, संध्याकाळी २१.
७) शनिवार दिनांक १५.०९.२०१८,सकाळी २८,संध्याकाळी २८.
८) रविवार दिनांक १६.०९.२०१८,सकाळी ४२, संध्याकाळी ५२.
माउंटमेरी जत्रेच्या कालावधीत प्रवाशांच्या सोयीसाठी चालविण्यात येणाऱ्या जादा बसगाड्यांची नोंद घेऊन , उपलब्ध केलेल्या बससेवेचा सर्व बसप्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमाने केले आहे.