नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज मोत्यांच्या सहाय्याने बनविलेली अद्वितीय कलाकृती भेट देण्यात आली. या कलात्मक कलाकृतीमध्ये भारताचा नकाशा असून त्यामध्ये पंतप्रधानांची प्रतिमा रेखाटण्यात आली आहे.
कलाकार खुशबू आकाश दावडा यांनी ही कलाकृती तयार केली असून त्यासाठी पाच लाख मोत्यांचा वापर केला आहे. या कार्यासाठी खुशबू यांनी १० किलोमीटर लांब धागा वापरला. सात फूट लांब आणि सात फूट रुंद अशी ही कलाकृती असून, ती बनवण्यासाठी ८५० तास लागले.
कलाकृती पंतप्रधानांना सादर करताना राजकोटचे खासदार मोहनभाई कुंदरिया उपस्थित होते.