मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेशाम मोपलवार यांच्यावरील आरोपांबाबत फॉरेन्सिक चौकशीसह एका महिन्यात संपूर्ण चौकशी करण्यात येईल. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना पदावरून दूर करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, सदस्य अजित पवार, जयंत पाटील यांनी मोपलवार यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी केली होती. त्यास उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.