मुंबई : मोनिका मोरेनी आज स्वत:च्या हातात ग्लास घेऊन मला पिण्याचे पाणी दिले, आयुष्यात धन्य झालो ! २८ ऑगस्ट २०२० ला मोनिकाला मनुष्य हात बसवण्यात आले, हॅण्ड ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया झाली आता तिचे हात काम करू लागले आहेत, अशी माहिती भाजप नेते डॉ. किरीट सोमैया यांनी दिली.
मोनिकाचे दोन्ही हात १२ जानेवारी २०१४ रोजी घाटकोपर रेल्वे अपघातात गेले होते. केईएम हॉस्पिटलमध्ये तिला आम्ही स्वप्न दिले होते, “तुझे हात तुला परत मिळणार”. १० जुलै २०१४ तिला आधुनिक इलेक्ट्रॉनिक दोन हात बसून दिले ज्याच्या मदतीने ती काम करू शकत होती. आता तिला चेन्नई च्या ब्रेन डेड पेशंटचे हात हॅण्ड ट्रान्सप्लांट करून बसवण्यात आले. त्या हातानी म्हणजेच स्वत:च्या हातानी मोनिकाने आमच्याशी हात मिळविला, स्वप्न साकार झाले, असे सोमैया यांनी म्हटले आहे.















