सर्वात प्रथम कोकणवृत्तसेवेवर
मुंबई : विक्रोळी कन्नमवार नगर येथील धर्मवीर संभाजी मैदानात तब्बल १०० बाय ९० फुट आणि ७५ हजार सीडीपासून भव्य आकाराचे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जगातील सर्वात मोठे मोझेक पोर्ट्रेट साकारण्यात आले आहे. युवा कलाकार चेतन राऊत आणि त्यांच्या टिमने अथक परिश्रमातून हे पोर्ट्रेट साकारले आहे. कलाकृती पूर्ण केल्यानंतर ती पाहण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत आहे. त्यासाठी १८ फुटांचे स्टेडीयमदेखील बांधण्यात आले आहे. गिनिज बुक आणि लिम्का बुक च्या विक्रमासाठी छायाचित्रे आणि चित्रफितसुद्धा पाठविण्यात आली आहे. बुधवार १० मे पर्यंत ही कलाकृती पाहता येणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी मोझेक पोर्ट्रेट पाहण्यासाठी यावे, असे आवाहन राऊत यांनी केले.