मुंबईः भारतीय नागरिकांमध्ये जबाबदारीची भावना वाढीस लागावी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी #60MinutesDeshKeNaam (60 मिनट देश के नाम) ही मोहीम भारतीय जनता युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष मोहित भारतीय यांनी सुरू केली आहे.
हॅशटॅग60MinutesDeshKeNaam या मोहिमेच्या माध्यमातून सजग समाज तयार करण्यासाठी लोकांनी जबाबदारी घ्यावी आणि त्यासाठी प्रत्येक आठवड्यात केवळ 60 मिनिटे देशासाठी समर्पित करायची आहेत. त्यात वृक्षरोपण, आपल्या परिसरात स्वच्छता मोहिमेत सहभाग घेणे, गरजू लोकांना अन्नदान करणे आदी सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही मोहीम सुरू करण्याबाबत आपली भूमिका मांडताना मोहित भारतीय म्हणाले की, ज्यावेळी सर्व मिळून आपण कोणतेही कार्य हाती घेतो, त्यावेळी परिवर्तन होते. समाजातील ज्वलंत मुद्द्यांची सोडवणूक करण्याची जबाबदारी स्वतः पासून करायला हवी.
ही मोहीम ऑफलाइनबरोबर ऑनलाइन सुरू राहणार आहे. प्रत्येक आठवड्यातील 10080 मिनटापैंकी 60 मिनटे समाजासाठी व्यतीत करावी लागणार आहेत. या मोहिमेत सहभागी झालेल्यांना एकत्र करून विविध कार्यक्रम या पुढे हाती घेण्यात येतील अशी माहिती भारतीय यांनी दिली. या मोहिमेत जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय यांनी केले आहे.
मोहित भारतीय यांचा मुंबई शहरातील अनेक सामाजिक उपक्रमात सहभाग राहिलेला आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समुद्र किनाऱ्यावरील तिवरे वाचवा, मुंबई वाचवा ही मोहीम राबविण्यात आली. या शिवाय गेले सात वर्षे ते इंडिया बुलियन एंड ज्वेलर्स असोसिएशनच्या अध्यक्षरूपात कार्य केले आहे