मुंबई: विक्रोळी येथील उत्कर्ष व्यायामशाळेची पॉवरलिफ्टर मोहिनी सावंत हिने इंडोनेशिया येथे नुकत्याच झालेल्या एशियन पॉवर लिफ्टिंग चॅम्पियन स्पर्धेत ५२ किलो वजनी गटामध्ये कास्यपदक पटकावले.
मोहिनीने आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेल्या चमकदार कामगिरीमुळे संस्थेचे मनोबल वाढले आहे. मोहिनीच्या कामगिरीबद्दल उत्कर्ष व्यायामशाळेच्या वतीने राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. बैठकांचा विक्रम नोंदवणारे माजी व्यायामपटू गोविंदराव यांनी मोहिंनीचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, मोहिनीने केलेली कामगिरी इतर खेळाडूंना प्रेरणादायी ठरणार आहे.
भविष्यात उत्कर्ष क्रीडा मंडळातर्फ क्रिडापटूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्याचा मानस आहे, असे ‘भारत श्री’ सैदल सोंडे यांनी सांगितले. रजनीनाथ लुडबे, मुकुंद कारखानीस, मनोज नेरुरकर, विनायक राणे यावेळी उपस्थित होते.