रत्नागिरी, (आरकेजी) : संघ आणि संताचं काम या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून दोघांचंही काम सारखंच असल्याचे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. ते आज रत्नागिरीतल्या नाणीज इथं नरेंद्रचार्यजी महाराज संस्थानच्या वतीने राष्ट्रीय संघाचा गौरव करण्यात आला, त्यावेळी भागवत बोलत होते.
संतांचे म्हणणं ऐकल्यामुळे कोणाच कधी नुकसान होत नाही. याचप्रमाणे संघाने काम सुरू ठेवलं आहे. संतांना माणसं लवकर कळतात. संघ आणि संत यांचे काम एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे भागवत यांनी यावेळी सांगितलं..
दरम्यान आपल्याकडे एकतेमध्ये विविधता आहे. अशा प्रकारे देश तयार करण्याचे काम संत करतात आणि तेच काम संघाकडून सुरू असल्याचे भागवत यांनी यावेळी सांगितले.
संघावर टीका करणाऱ्यांना टोला
संघावर टीका करणाणार्यांवर मोहन भागवत यांनी अप्रत्यक्षरित्या टोला लगावला. संघ मोठी शक्ती झाल्यानेच आज संघाची देश आणि विदेशात चर्चा सुरू आहे. संघाच्या शक्तीला अनुकुल असलेले लोक आज संघाची स्तुती करत आहेत. हि शक्ती ज्याला अनुकुल नाही ते संघावर टिका करत असल्याचा टोला भागवत यांनी यावेळी लगावला..
संघाचा गौरव
या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गौरव करण्यात आला. ताम्रपट व 5 लाख रुपये रोख सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. मात्र मोहन भागवत यांनी देणगी पुन्हा संस्थानकडे परत केली. तसेच देणगीचा विनियोग करण्याची जबाबदारी नाणीज संस्थानची असल्याचं सांगितलं.