मुंबई, (निसार अली) : विलेपार्ले येथील ज्येष्ठ साहित्यिक मोहन बी .जाधव यांना नाशिकच्या तुळजा भवानी सभागृहात मिलिंद संस्थेंच्या वतीने राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षक आमदार सुधीर तांबे यांच्या हस्ते जाधव यांना हा पुरस्कार रविवार दिनांक 28 ऒक्टोबर रोजी नाशिकचे शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, मिलिंद संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब हांडे, संस्थापक मिलिंद जाधव ,कार्याध्यक्ष देविदास जाधव यांची प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. मोहन जाधव यांचे विविध कथा संग्रह व काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेंत . त्यांच्या सामाजिक कार्याचादेखील अनेंक संघटनांनी गौरव केला आहे. त्यांना आतापर्यंत अनेंक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत .