डोंबिवली : माजी महापौर स्वर्गीय शाहू वामन सावंत यांच्या पुण्यतिधी निमित्त आयोजित मोफत नेत्र चिकित्सा शिबिरात रुग्णांची नेत्र तपासणी करून त्यांना अल्प दरात चष्मे देण्यात आले. सदर शिबिराचे आयोजन महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि शाहू सावंत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.
पश्चिमेकडील न्यू फ्लोरा सोसायटी, कैलाशनगर येथील स्व. शाहू सावंत प्रतिष्ठान कार्यालयात मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन केले होते. शाहू सावंत प्रतिष्ठानचे संस्थापक तथा चिरंजीव डॉ. सर्वेश सावंत आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत नेत्र चिकित्सा शिबीर घेण्यात आले. यावेळी डॉ. सावंत म्हणाले, गरीब आणि गरजू नेत्र रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच नेत्र समस्या निर्मुलन करणे हा उद्देश आहे. प्रत्येक महिन्याला अशा प्रकारे सामाजिक उपक्रम आम्ही घेत असतो.
यावेळी डॉ. सावंत म्हणाले, डोळयांवर ताण पडल्याने डोके दुखते. फळयावरील छोटी अक्षरे मुलांना वाचता न येणे. फळा किंवा टी.व्ही., इ. दूरच्या वस्तूंकडे बघताना डोळे बारीक करणे. वाचताना पुस्तक तोंडाजवळ धरणे. जवळचे किंवा लांबचे नीट न दिसणे. जास्त तास वाचन केल्यास डोळयांवर ताण पडणे. तिरळेपणा दिसणे. डोळे किंवा डोकेदुखी. दृष्टीदोषावरील उपचार दृष्टीदोषाच्या प्रकाराप्रमाणे योग्य चष्मा वापरावा लागतो. लहान वयात येणाऱ्या या दृष्टीदोषावर योग्य प्रकारचे भिंग (चष्मा) वापरून दृष्टी सुधारता येते. चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्सच्या ऐवजी डोळयाचा नंबर दुरुस्त करता येतो. ही शस्त्रक्रिया 18च्या वयानंतरच केली जाते.
दिवसभर पार पडलेल्या शिबिरात सुमारे 400 नेत्र रुग्णांनी लाभ घेतला यामध्ये 165 नेत्र रुग्णांना अल्प दारात चष्मे देण्यात आले. तर मोतीबिंदू रुग्णांना शस्त्रक्रियेची तारीख देण्यात आली. युनिक आय हॉस्पिटल आणि साई ऑप्टीक मधील डॉक्टरांनी तसेच कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शिबीर यशस्वी करण्यासाठी विनोद सावंत, कैलाश पवार, अभय टेमकर, मिलिंद घोसाळकर, विनय कांबळे, तुषार नाईक, अशोक मोरे, लारा, प्रशांत निवाते, विनय निवाते, दिगंबर घुगे, दयानंद पवार, काशिनाथ परब आदी कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.