रत्नागिरी दि.२४:- जिल्हा शासकिय रुग्णालय रत्नागिरी आणि मगदुम एण्डो सर्जरी इन्स्टिट्यूट कोल्हापूर यांच्या विद्यमाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत मूत्ररोग निदान, उपचार व शस्त्रक्रिया शिंबीर जिल्हा शासकिय रुग्णालय रत्नागिरी येथे पार पडले. यामध्ये मगदुम एण्डो सर्जरी इन्स्टिटयुट कोल्हापूरचे डॉ. विश्वनाथ एन. मगदूम यांचेसह जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, डॉ. ज्ञानेश विटेकर, डॉ. मिथिलेश घोसाळकर, डॉ. विलास गुरव, डॉ. मंगला चव्हाण, डॉ. प्रथमेश आसवले या शिबीरात सहभागी झाले होते. डॉ. विश्वनाथ एन. मगदूम यांचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले तसेच आस्था फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. मुग्धा रेठरेकर आणि ज्येष्ठ पत्रकार दत्ता महाडीक यांचेतर्फे डॉ. मगदूम यांचे शाल, श्रीफळ देवून स्वागत केले. याशिबीराचा लाभ ६५ रुग्णांनी घेतला. यापूर्वीही असेच शिबीर दर महीन्यास डॉ. मगदूम यांचे चिरंजीव डॉ. प्रसाद मगदुम घेत होते असे डॉ. फुले यांनी सांगितले. या शिबीराला रुग्णालयाच्या सर्व कर्मचारी, संपर्क युनिक फाउंडेशनचे कर्मचारी तसेच जिल्हा रुग्णालयातील महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे कर्मचारी यांनी सहकार्य केले.














