मुंबई : मुंबईला पाणी पुरवठा करणार्या सातही तलाव क्षेत्रात दमदार पाऊस पडत आहे. त्यापैकी मोडकसागर पाठोपाठ तानसा तलाव आज सायंकाळी ४ वाजून ५५ मिनिटांनी ओसंडून वाहू लागला आहे. मागीलवर्षी हा तलाव २ ऑगस्ट रोजी पहाटे २ वाजून १० मिनिटांनी ओसंडून वाहू लागला होता.
मुंबईला पाणीपुरवठा करणार्या सात धरणांची पाणी साठवणूक क्षमता ही एकूण साडेचौदा दशलक्ष लिटर असून आजपर्यंत सातही तलावात १० लाख २८ हजार ४२१ लक्ष लिटर्स पाणीसाठा जमा झाला आहे.
१८ जुलै २०१७ ला पाण्याची स्थिती :
धरणाचे नाव सध्या तलावातील साठा
अप्पर वैतरणा १०९९०५
मोडक १२८९२५
तानसा १४१०६३
मध्य वैतरणा १८०१००
भातसा ४४८९५२
विहार १४२८५
तुलसी ५१९०
एकूण १०२८४२१