मुंबई : विद्यार्थीनींसाठी असणाऱ्या प्रसाधनगृहात छुपा मोबाइल कॅमेरा ठेवून त्याचे चित्रीकरण करण्याचा प्रकार येथील विक्रोळीतील एका प्रसिद्ध शाळेत उघडकीस आला आहे. या प्रकरणी विजय शिवथरे(२९)या शिपायाला अटक करण्यात आली आहे.
बुधवारी संध्याकाळी साडे चारच्या सुमारास १९ वर्षांची विद्यार्थिनी प्रसाधनगृहात गेली होती. याचवेळी तिला मोबाइल ठेवलेला दिसला. विद्यार्थिनीने त्वरित याची माहिती शाळेच्या शिक्षकांना दिली. शाळा प्रशासनाने गंभीर दखल घेत शिपायाविरोधात पोलिसात तक्रार केली. तसेच त्याला निलंबित करण्यात आले.
पोलीसांनी आरोपी शिवथरे याचा मोबाइल ताब्यात घेतला. त्यात आक्षेपार्ह चित्रीकरण सापडले नाही, अशी माहिती विक्रोळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर हंसाटे यांनी दिली.