
मुबंई : विक्रोळी येथे 6 मनसैनिकांवर केलेल्या हल्ल्याचा बदला आज सकाळी मनसेने घेतला. आझाद मैदानाजवळ असलेल्या मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन तेथील वस्तूंची काही मनसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. याचा काँग्रेस नेत्यांनी निषेध केला आहे.
आज सकाळी जेव्हा हल्ला झाला, त्यावेळी त्याची जबाबदारी कोणीही स्वीकारली नव्हती. परंतु, काही वेळाने मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी याबाबत एक ट्विट केल्यानंतर हा हल्ला मनसेने केल्याचे स्पष्ट झाले. “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भय्या संजय निरुपमच्या कार्यालयावर सर्जिकल स्ट्राईक केला असून इट का जवाब पथ्थर से मिलेगा,” असे ट्विट संदिप देशपांडे यांनी केले.
विक्रोळीतील राड्यानंतर मनसेच्या गुंडांनी परत मार खाल्ला, असे डिवचणारे ट्विट मुबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केले होते.
आज काँग्रेस कार्यालयावर हल्ला झाल्यानंतर संजय निरुपम यांनी ट्विट करून प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा दिला आहे.















