मुंबई, (निसार अली) : मनसेचे मालाड पश्चिम विभागाचे उप विभागप्रमुख आणि कट्टर मनसैनिक अशी ओळख असलेले संभाजी साळुंखे यांचे अल्पशा आजाराने २९ एप्रिल रोजी निधन झाले. राज ठाकरे यांच्यावर निष्ठा असलेले साळुंखे हे मनसेच्या स्थापनेपासून पक्षात होते. एक सामान्य कार्यकर्ता ते उप विभागप्रमुख अशी वाटचाल त्यांनी पक्षात केली. सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी ते नेहमीच आदराने वागत. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील घिगेवाडी येथे त्यांचे निधन झाले, अशी माहिती मनसेचे सुशांत मालवदे यांनी दिली.