भास्कर जाधव आमच्या वाटेला गेलात तर तुमच्या बैठकांमध्ये तमाशा करू : अविनाश जाधव यांचा इशारा
रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्थ पाठिंबा जाहिर केला आहे. त्यांचा शब्द आम्ही पडून देणार नाही. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदरसंघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या मागे ठाम उभे राहुन त्यांना निवडून आणणारच. परंतु संपत आलेल्या पक्षाचे (उबाठा) नेते म्हणून मिरवणाऱ्या भास्कर जाधव यांना इशारा देतो की, राज ठाकरेंबाबत वाट्टेल ते बडबडू नका. आमच्या वाटेला गेलात तर बैठकांमध्ये तमाशा करायला वेळ लागणार नाही, असा इशाऱा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिला.
लोकसभेच्या पार्श्वभुमिवर मनसेची रत्नागिरीत सभा झाली. त्यांतर विवेक हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी सरचिटणीस वैभव खेडेकर, रत्नागिरी द. जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, रत्नागिरी विधानसभा अध्यक्ष सुनिल साळवी, तालुका अध्यक्ष रुपेश जाधव, शहर अध्यक्ष अद्वैत कुलकर्णी, सह संपर्क अध्यक्ष मनीष पाथरे उपस्थित होते.
श्री. जाधव म्हणाले, पाडव्याला झालेल्या शिवतिर्थावरील विराट बैठकीमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्थ पाठिंबा जाहिर केला आहे. साहेबांचा शब्द म्हणजे शब्द आम्ही रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवाराला निवडुन देऊ उद्धव ठाकरे, विनायक राऊत आणि भास्कर जाधव यांना उत्तर देऊ. पुर्ण ताकदीन राणेंच्या मागे उभे राहुन निवडुण आणू. आम्ही पक्ष आदेशावर जगणारी माणसं आहे. महायुतीमध्ये आम्हाला मानसन्मानाने बोलावले जात आहे. त्यामुळे सर्व ताकद लावून या निवडणुकीला सामोरे
जाऊ. उबाटाच्या उमेदवाराला पडणे हे आमच्यासाठी महत्वाचे आहे. शपथ घेतोय भास्कर जाधव सतत टीका करताय आम्ही त्यांच्या उमेदवाराला पडून उत्तर देऊ.
राज्यात त्यांचा एक उमेदवार निवडून येईल,अशी स्थिती आहे. पण आमच्या वाटेला गेलात तर सोडणार नाही. काय खाज आहे माहित नाही. राज ठाकरेंबाबत एवढे काय दुखणे आहे ते समजत नाही. बाळासाहेबांचा मुलगा म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडुन अनेक अपेक्षा होत्या परंतु ते धोंडा निघाले, असा टोलाही त्यांनी लगावला.
भास्कर जाधव यांना इशारा द्यायचा आहे की, वारंवार तुम्ही राज ठाकरेंबद्धल बडबडु नका. आम्ही तुमचे किंवा तुमच्या पक्षाचे उद्धव ठाकरे यांचे नाव पण घेत नाही. परंतु आमच्या वाटेला गेलात तर तुमच्या बैठकांमध्ये तमाशा करायला वेळ लागणार नाही. संपलेल्या पक्षाचे पुढारी म्हणून तुम्ही मिरवताय मग शिवतिर्थावर मनसे सारखी विराट सभा घेऊन दाखवा, असे आव्हान देखील जाधव यांनी दिले.
रामदास कदम-वैभव खेडकरांची लवकरच बैठक
माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि मनसेचे नेते वैभव खेडेकर यांच्या छत्तीचा आकडा आहे. अनेक विषयांवरून त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ताणाताणी झाली. अगदी गुन्हे दाखल करण्यापर्यंत हा विषय गेला आहे. परंतु आता महायुती म्हणून सर्व एक असल्याने याबाबत राज ठाकरे यांनी हस्तक्षेप करून रामदास कदम व वैभव खेडेकर यांची बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यात येणार आहे, अशी माहिती अविनाश जाधव यांनी दिली.