डोंबिवली, 31 may (प्रशांत जोशी) : कल्याण-डोंबिवली मध्ये कोरोना टेस्टिंग लॅब सुरु करा, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी 29 मार्च रोजी केली होती आणि त्याचा पाठपुरावा सुद्धा करत होते. आता ती मागणी मान्य झाली असून जून मध्ये टेस्टिंग लॅब सुरु करण्यात येणार आहे.
कोरोना वाढता प्रादुर्भाव पाहता मनसे आमदार राजू पाटील यांनी कल्याण-डोंबिवली मध्ये कोरोना टेस्टिंग लॅब सुरु करा अशी मागणी करत पाठपुरावा केला होता. केडीएमसी आयुक्तांनी जून महिन्यात कोरोना टेस्टिंग लॅब सुरु करणार आहोत असे पत्रकारांना सांगितले.त्यामुळे मनसे आमदार यांच्या पाठपुराव्याला पुन्हा यश आले आहे.यापूर्वी सुद्धा कोरोना रुग्णांना मोफत उपचार मिळावा यासाठी पत्रव्यवहार आणि पाठपुरावा सर्वात प्रथम मनसे आमदार यांनी केला होता आणि या पाठपुराव्याला यश आले. मनसे आमदारच्या पाठपुराव्याची राज्यसरकार कडून दखल घेतली जात असून सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि केडीएमसी आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांचे राजू पाटील यांनी आभार मानले आहेत.