रत्नागिरी, (आरकेजी) : रत्नागिरीचे लोकप्रिय आमंदार तथा माजी नगरविकास मंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शहर रत्नागिरी च्यावतीने आज सर्व शहरामध्ये प्रत्येक प्रभागात विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी १० वाजता ग्रामदैवत श्री भैरी देव चरणी, मा उदय सामंत याना दीर्घायुष्य मिळो म्हणून अभिषेक व प्रार्थना करण्यात येणार आहे. तसेच आशादीप संस्थेत नगरसेविका वैभवी खेडेकर, उपशहर प्रमुख विजय खेडेकर, माजी नगरसेवक पापय धुळप, सलील डाफळे – विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत वस्तू वाटप करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे चार रस्ता मजगाव रोड येथे हायमास्ट उद्घघाटन आणि माळनाक येथे शिर्के चौकाच्या नावाचे अनावरण करण्यात येणार आहे.
कोकणनगर येथील बालवाडीत खाऊ वाटप, कुष्ठरोग वसाहतीमध्ये धान्यवाटप, तसेच विध्यार्थ्यांना वेगवेगळ्या खेळांचे साहित्य वाटप, माहेर संस्थेत खाऊ वाटप, दामले हायस्कुलमध्ये पेढे वाटप, निवखोल शाळेत खाऊ वाटप, रिमांड होम मधील विध्यार्थ्यांना खाऊ वाटप व गरिबांना धान्य वाटप, शाळा क्र.१ मध्ये खाऊ वाटप, नागरिकांच्या मदतीने स्वच्छता अभियान राबवणे व आरोग्य शिबीर राबवणे, प्रभाग क्र. ११ मध्ये अंगणवाडी शेडचे उद्घघाटन होणार आहे.
प्रभाग क्र.१३ मध्ये शाळा क्र.७ मध्ये खाऊ वाटप, तसेच तेलीआळी तळ्याजवळ हायमास्ट चे उद्घघाटन तसेच झोपडपट्टीत अन्नदान शाळा क्र.३ मध्ये मुलांना गणवेश वाटप करण्यात येणार आहे.
शासकिय रुग्णालयात फळ वाटप आणि युवासेना शहर यांच्या तर्फ शासकीय रुग्णालय येथे रक्तदान शिबिर, तसेच अपघात विभागाला वॉटर प्युरिफायर भेट देण्यात येणार आहे. तसेच महिला शहर आघाडी तर्फ जिल्हा रुग्णालयात बेटी बचाव कार्यक्रम घेण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला शहरातील सर्व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी ,कार्यकर्ते, शिवसैनिक आणि रत्नागिरीतील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन रत्नागिरी शिवसेना शहर प्रमुख बिपिन बंदरकर यांनी केले आहे.