मुंबई, (निसार अली) : मालाड पश्चिम विधानसभेचे आमदार अस्लम शेख यांनी बुधवार दिनांक 21 ऑगस्टला तरुणांशी विविध मुद्द्यांवर चर्चा करून संवाद साधला. युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षण, मालवणीतील कचरा व्यवस्थापन व बाल संवर्धन समिती याबाबत चर्चा झाली. युवा संस्था मालवणीत विविध घटकांसोबत कार्य करत आहे, संस्थेच्या कामाचे शेख यांनी कौतुक केले.
या चर्चेमधील विषयांच्या पूर्ततेसाठी आमदार शेख यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. कौशल्य प्रशिक्षणासाठी जागा, लायब्ररी, संसाधने व महानगर पालिकेच्या विविध यंत्रणेंसोबत बैठकी आयोजित करून युवा संस्थेमार्फत जास्तीत जास्त युवकांना कसे प्रशिक्षण देता येईल यावरही चर्चा झाली
मालवणीतील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न संबंधित यंत्रणेसोबत जोडून कसा सोडवता येईल, यावर चर्चा झाली. संस्थेसोबत हि प्रक्रिया अंबुजावाडी व मालवणी स्तरावर चालवणार आहोत. बाल संवर्धन समिती संदर्भात नागरसेवकांशी बोलण्यासाठी पुढाकार घेऊ असे आश्वासन शेख यांनी दिले .
सदर भेटीत मालवणीतील महिला गटाचे प्रतिनिधी, सोसायटी प्रतिनिधी, बालधिकार संघर्ष संघटनचे बालप्रतिनिधी, युवक युवती, मालवणी युवा परिषदेचे प्रतिनिधी, नक्षत्र तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते, सय्यद निसार अली, युवा संस्थेचे सचिन नाचणेकर, मरिना जोसेफ , अमित गवळी, एलिशा टॉवरो, सूर्यकांत मोरे, आसमा अन्सारी इतर कार्यकर्ते उपस्थित होते.