
या यशामुळे एमआयटी एडीटी विद्यापीठाने जागतिक स्तरावर उच्च शिक्षणातील अग्रगण्य संस्था म्हणून आपली प्रतिष्ठा मजबूत केली आहे. क्युएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग हे शैक्षणिक गुणवत्तेचे आणि संस्थात्मक कार्यक्षमतेचे महत्त्वपूर्ण मापदंड म्हणून ओळखले जाते, जे शिक्षणातील उत्कृष्टतेचे मूल्यांकन आणि प्रोत्साहन देण्यासाठी महत्वपूर्ण काम करते.
एमआयटी एडीटी विद्यापीठ संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष प्रा.डॉ.मंगेश कराड यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि कार्यकारी संचालिका प्रा.डॉ.सुनिता कराड यांच्या मार्गदर्शनाखाली आर्ट, डिजाईन आणि टेक्नॉलॉजी या शाखांत जागतिक दर्जाचे नाविण्यपूर्ण शिक्षण पुरवत आहे. त्यामुळे विद्यापीठाला या रँकिंगमध्ये स्थान मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांसह राज्यभरातून एमआयटी एडीटी विद्यापीठावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
एमआयटी एडीटी विद्यापीठाला गतवर्षी प्रमाणे याही वर्षी क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग मध्ये कला आणि डिझाइन श्रेणीमध्ये १५१-२०० अशा प्रभावी रँक बँडसह स्थान मिळणे आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट असून ती सर्वांच्या कष्टाची पावती आहे. विद्यापीठाने राष्ट्रीय कला अकादमी (एनआयडी), अहमदाबादच्या बरोबरीने ही क्रमवारी प्रात्प केली असून, संपूर्ण भारतात केवळ एमआयटी एडीटी, आयआयटी मुंबई आणि एनआयटी या संस्थांनी या श्रेणीत स्थान मिळवले आहे.
-प्रा.डॉ.मंगेश कराड,
कार्यकारी अध्यक्ष,
एमआयटी एडीटी, विद्यापीठ, पुणे.