नवी दिल्ली : नौवहन मंत्रालयाने आपले संकेतस्थळ shipmin.gov.in अद्ययावत करून 30 एप्रिल 2020 रोजी त्याचा प्रारंभ केला आहे.
नवे संकेतस्थळ ओपन सोर्स टेक्नोलॉजीवर आधारित आहे. भारत सरकारच्या संकेतस्थळांसाठी, भारत सरकारच्या प्रशासकीय सुधारणा आणि तक्रारनिवारण विभागाने जारी केलेल्या, मार्गदर्शक सूचनांनुरूप हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे.
नव्या संकेतस्थळाचे होमपेज आकर्षक असून सोशल मीडियाला ठळक स्थान देण्यात आले आहे. व्हिडिओ अपलोडिंगची अधिक चांगली सुविधा हे या संकेतस्थळाचे नवे वैशिष्ठ्य आहे.