मालाड,ता.7(निसार अली) : मिनी लॉकडाउनमुळे मॉल, दुकाने बंद करावी लगल्याने आपली नाराजी व्यक्त करत मालाड पश्चिमेत व्यापाऱ्यांच्या विविध संस्था, संघटनांनी आज निदर्शने केली.
राज्य सरकार कडून अचानक घोषित केलेल्या मिनी लॉक डाऊन विरोधात मालाड मधील विविध व्यापारी संस्था संघटना एकवटल्या. मालाड व्यापारी संघटना, नटराज व्यापारी असोसिएशन तसेच इतर व्यापारी या निदर्शनात सहभागी झाले होते.
त्यांनी मागणी केली की, सरकार ला व्यापाऱ्यांचा विसर पडला आहे. तसेच अचानक केलेल्या लॉकडाउन मुळे व्यापाऱ्यांसह कामगार ही भरडले जात आहेत. या बाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.