मालाड, 14 मे : लोकप्रतिनिधी हा जनता आणि प्रशासन यांच्यातील मुख्य दुवा असतो. प्रशासकीय निर्णयांमध्ये लोकभावनेचं प्रतिबिंब उमटावं यासाठी लोकप्रतिनिधीने सजग, जागरुक व सातत्याने अभ्यास करुन अद्ययावत राहणं आवश्यक आहे. जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी मंत्री बनतो तेव्हा त्याच्या अधिकारांबरोबच जबाबदारीची व्याप्तीही वाढत असते. मिळालेल्या अधिकारांचा वापर करुन मंत्री महोदय जबाबदारीला किती न्याय देतात यावरुनच त्यांच्या कामगिरीचं मुल्यमापन केलं जातं.
मालाड विधानसभेतून सतत तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडून गेलेले अस्लम शेख जनता आणि प्रशासन ह्यांच्यातील मुख्य दुवा बनले असल्याचे चित्र मुंबई शहर व उपनगरामध्ये पहायला मिळत आहे. अस्लम शेख यांच्यावर मुंबई शहरचे पालकमंत्री असण्याबरोबरच वस्त्रोद्याेग, मत्स्यव्यवसाय व बंदरे या खात्यांचिही जबाबदारी आहे. ह्या तिनही खात्यांचे प्रश्न सोडवताना पालकमंत्री म्हणून असणाऱ्या जबाबदाऱ्यांचे निर्वाहन करणे व त्यातही कोरोनामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करणे ही तारेवरची कसरतच म्हणावी लागेल. पण याही परिस्थितीत अस्लम शेख फक्त समाजमाध्यमांवर किंवा व्हिडिओ कॉन्फरंसिंगवर विसंबून न राहता बैठकांवर बैठका घेत आहेत. त्यांच्या या बैठकांचे प्रतिबिंब प्रशासकीय निर्णयांमध्ये देखील दिसत आहे. मुंबई शहरामध्ये ‘कोरोना’च्या सर्वाधिक चाचण्या होणं हा अस्लम शेख यांनी घेतलेल्या बैठकांचाच परिणाम म्हणावा लागेल.
आतापर्यंत ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर अस्लम शेख यांनी अधिकाऱ्यांसोबत डझनभर बैठका घेतलेल्या आहेत. डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना वैयक्तीक संरक्षण संचासाठी जिल्हा नियोजन समितिमध्ये 3.63 कोटी रुपयांची तरतुद करणं, खाजगी रुग्णालयांना संरक्षण विषयक मार्गदर्शक तत्त्व आखून देण्यासाठी महापालिकेस निर्देश देण, रुग्णालयांमध्ये कोरोग्रस्तांसाठी बेडची व्यवस्था करणं, कब्रस्थांनांमध्ये कोरोनामुळे मृत पावलेल्यांसाठी वेगळी व्यवस्था करणं व मृतांना दफन करण्यासाठी विशेष कार्यदल स्थापन करुन त्यांचा पगार शासनामार्फत देण्याचा निर्णय घेणं, रमजानमध्ये मुंबईतील अतिसंवेदनशील भागांमध्ये रोजा ठेवणाऱ्या मुस्लिम बांधवासाठी फळे,खजूर दुध व अन्य खाद्यपदार्थ महानगरपालिका व पोलिसांच्या माध्यमातून घरपोच देण्याची व्यवस्था करणं, पुजा, प्रार्थना, नमाज यासाठी धार्मिक स्थळांच्या ठिकाणी पाच पेक्षा जास्त लोक एकत्र आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश काढणं हा ना.अस्लम शेख यांनी घेतलेल्या बैठकांमधुन निघालेलं निष्पन्न आहे.
हे सारं करत असताना टाळेबंदीच्या झळा सोसत असणाऱ्या मच्छिमारांसाठी मासे, मत्स्यखाद्य, मत्सबीजाचा समावेश अत्यावश्यक बाबींमध्ये करुन त्यांच्या वाहतूकीस परवानगी देणं व मत्सव्यवसायिकांचे कोट्यवधींच नुकसान टाळणं, मच्छिमारांसाठी विशेष आर्थिक पँकेजसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचं कामही चालू असतं. चिनमध्ये कोरोना विषाणूने थैमान घातल्यानंतर फेब्रूवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच परदेशातून महाराष्ट्राच्या बंदरांवर येणाऱ्या जहाजांवरील खलाशी व इतर कर्मचाऱ्यांची वैद्यकीय चाचणी करण्याचे व शहरांमध्ये त्यांच्या प्रवेशास प्रतिबंध करण्याचे आदेश शेख यांनी देऊन आपल्या दुरदृष्टीचा परिचय दिला होता,
अस्लम शेख आपल्या खात्यांशी निगडित विविध विषय धसास लावतचआहेत त्याचबरोबर ते आपल्या मतदार संघातही शेकडो कुटूंबांना अन्न धान्याच वितरण आपल्या टीम च्या माध्यमातून करुन सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडवत आहेत. मढ, भाटी, मनोरी , गोराई येथील मच्छिमार सोसायट्यांनाही अन्नधान्याची किट्स अस्लम शेख यांच्या माध्यमातून पोहोचविण्यात आलेली आहेत. सोसायट्यांच्या माध्यमातून ही किट्स हजारो मच्छिमारांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
काही दिवसांपुर्वी मालवणीतील पोलिसांनी एक फ्लँग मार्च आयोजित केला होता. या फ्लॅग मार्चमध्ये सहभागी होऊन ना.अस्लम शेख यांनी नागरीकांना घरीच थांबण्याचे आवाहन केले होते.
मंत्र्याने आपल्या वातानुकूलित दालनातून बाहेर पडून मैदानात उतरणे ही बाबच संपुर्ण प्रशासकीय यंत्रणेचं मनोबल वाढवणारी असते.