
मुंबई, (निसार अली) : मुंबई पोलीस दलात सहायक आयुक्त या पदावर कार्यरत असलेले मिलिंद भिकाजी खेटले यांना दिनांक 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती पोलीस पदक राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीत प्रदान करण्यात येणार आहे. मिलिंद खेटले सध्या साकी नाका विभाग येथे सहायक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. या आधी 1997 मध्ये शौर्यासाठी राष्ट्रपती पोलीस पदक व 2OO7 साली पुन्हा गुणवंत सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले होते. त्यांचे तिसरे राष्ट्रपती पोलीस पदक आहे. मिलिंद खेटले यांची कुशल प्रशासक म्हणून ओळख आहे. विशेष करून गुन्हेगारांमध्ये धाक आहे. पदकांची हॅटट्रिक मिळाल्याने आनंद व्यक्त केला आणि वरिष्ठ अधिकारी, सहकारी कर्मचारी, कुटुंबियांना याचे श्रेय दिले.















