
डोंबिवली, (प्रशांत जोशी) : औद्योगिक विभागातील अति संवेदनशील कंपन्यांची संबंधित सरकारी विभागाने पाहणी करणे आवश्यक आहे. कंपनी मालक नियमांचे पालन काटेकोरपणे करतात हे याच माध्यमातून समजून येईल. जर कोणी नियम धुडकावून काम करीत असतील तर त्यांना ताबडतोब कारखाना बंद करण्याची कायदेशीर कारवाई करता येईल पण असे होतांना दिसून येत नसल्याने अशा घटना होत नसल्याचे निदर्शनास येत असून परिणामी हे असे अपघात वारंवार होत आहेत.
यामध्ये सामान्य नागरिकांचा उगाच बळी जातो.
घटनेतील दोषींवर कडक कारवाई व्हायला हवी अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.
रामदास आठवले शुक्रवारी डोंबिवलीतील कंपनीत स्फोट झालेल्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी डोंबिवलीत आले होते. घटनेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्याबद्दल दुःख व्यक्त केले. रिऍक्टर किंवा बॉयलर आदींची वेळोवेळी पाहणी करायला पाहिजे. त्याविषयी खरा अहवाल दिला गेला पाहिजे. परंतु जे झाले ते दुर्देवी आहे अशा घटना घडू नयेत यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे येऊन ज्या घोषणा केल्या आहेत त्याची अंमलबजावणी होण्यासाठी आम्हीही पाठपुरावा करून त्यांना सहकार्य करू असेही त्यांनी पुढे सांगितले.















