मुंबई : राज्यातील जनता आणि मुख्यमंत्री यांच्यातील संवाद अधिक दृढ होण्यासाठी ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ हा कार्यक्रम माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत घेण्यात येत आहे. राज्यातील जनतेने ई- मेल, व्हाटस ॲप आणि थेट विचारले़ल्या प्रश्नांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरे दिली आहेत. ‘संकल्प शाश्वत शेतीचा’या विषयाच्या अनुषंगाने भाग दुसरा ‘दूरदर्शन’ आणि ‘आकाशवाणी’वरून प्रसारण करण्यात येणार आहे.
दूरदर्शनवर कार्यक्रमाची वेळ आणि दिवस
‘संकल्प शाश्वत शेतीचा’ भाग दुसरा हा दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून रविवार दिनांक १६ एप्रिल रोजी सकाळी १०: ३० वाजता प्रसारित होणार आहे तर या कार्यक्रमाचे पुन:प्रसारण सोमवार दिनांक १७ एप्रिलला सायंकाळी ५:३० ला होईल.
आकाशवाणीवर कार्यक्रमाची वेळ आणि दिवस
‘संकल्प शाश्वत शेतीचा’ भाग दुसरा हा आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात सोमवार १७ आणि १८ एप्रिल रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० वाजता या वेळेत प्रसारित होईल. या दोन्ही भागांचे पुन:प्रसारण १७ आणि १८ एप्रिलल सायंकाळी ७:१५ ते ७.३० या वेळेत होईल. १