मुंबई- कोकण विभाग म्हादे परिवाराने कोकणातील म्हादे परिवाराचे शोध घेण्यासाठी ९ मे ते १२ मे २०१८ रोजी शोधकार्य दौऱ्याचे आयोजन केले होते. मोठ्या उत्साहात रविवारी दौरा संपन्न झाला. दरम्यान पिढ्यांपिढ्या विस्तापित झालेल्या म्हादे कुटुंबाने सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून प्रथमच एकत्र येत असल्याची भावना व्यक्त केली.
फेसबूक, व्हाट्सएप या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या कोकण विभाग म्हादे परिवाराने रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून म्हादे बंधूंची शोधमोहीम हाती घेतली. खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, देवरुख या तालुक्यातील हेदली, तळसर, शेंबवणे, पांगरी, मेर्वी, भू, पेंडखळे, रायपाटण, खडीकोळवण या गावातील म्हादे वाड्यांना भेटी देऊन तेथील रूढी, परंपरां जाणून घेतल्या. दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पिढ्यांपिढ्या विस्तापित झालेल्या म्हादे कुटुंबाने सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून प्रथमच एकत्र येत असल्याची भावना व्यक्त करून शोधकार्यासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन यावेळी अनेकांनी केले. तसेच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व कौटुंबिक उपक्रम राबविण्यासाठी एकत्र येण्याचा संकल्प कुटुंबीयांनी केला. व्हाट्सएप ग्रुपचे अडमिन विलास म्हादे व संदीप म्हादे यांच्या नेतृत्वाखाली दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. गणेश म्हादे, राकेश म्हादे, काशिनाथ म्हादे (पत्रकार), प्रदीप म्हादे, रवींद्र म्हादे, सुमित म्हादे, मंदार म्हादे, राजेंद्र म्हादे, प्रभाकर म्हादे, संजय म्हादये व सत्यवान म्हादये यांनी परिवाराच्या शोधकार्यात सहभाग घेतला होता.