रत्नागिरी (आरकेजी) : कोकणनगर येथील म्हाडा प्रकल्पाची महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणचे अध्यक्ष उदय सामंत यांनी गुरुवारी पाहणी केली. म्हाडाचे लहाणे, रत्नागिरीचे प्रांतधिकारी अमित शेडगे, रत्नागिरी तहसिलदार मच्छिंद्र सुकटे, रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडीत आदि मान्यवर उपस्थित होते.
कोकणनगर येथील म्हाडा प्रकल्पाबाबतच्या समस्या तेथील जनतेकडून सामंत यांनी जाणून घेतल्या. यावेळी तेथील नागरिकांनी दिलेल्या निवेदनाबाबत बोलताना म्हाडा अध्यक्ष म्हणाले कोकण नगर येथील म्हाडाचे कार्यालय प्रत्येक महिन्यांच्या १५ ते ३० तारखेदरम्यान येणाऱ्या दर सोमवारी सुरु असेल. कुठल्याही परवानगी, ना हरकत दाखल्यासाठी आता म्हाडाची ऑनलाईन सेवा सुरु असल्याने आपल्याला वारंवार मुंबई कार्यालयाकडे जावे लागणार नाही. निवेदनात मागणी केलेल्या म्हाडाच्या तीस वर्षाचे भुईभाडे एकरकमी भरण्याची व त्याद्वारे मोठी सुट मिळण्याबाबत जुनी योजना परत सुरु करण्याबाबत उदय सामंत यांनी प्राधिकरण्याच्या बैठकीत याबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासित केले. तसेच म्हाडाकडून वितरीत करण्यात आलेल्या आणि सर्वे न केलेल्या भुंखडाचे तात्काळ सर्वे करुन घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबधिताना दिल्या. तसेच ज्यांना भुखंड देऊन तीन वर्षे होऊन गेलेत पंरतु अद्याप त्यांनी घरे बांधलेली नाहीत त्याबाबत योग्य कार्यवाही करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले तसेच कोकणनगर म्हाडा वसाहतीमधील ड्रनेज काम लवकरच पूर्ण करण्यात येईल असे आश्वसनही त्यांनी यावेळी दिले. नाचणे येथील जागेची पाहणी नाचणे येथील शासकीय जागेची देखील पाहणी केली. नाचणे येथे असलेल्या या ३ एकर जागेपैकी दिड एकर जागेवर शासकीय अधिकारी , कर्मचारी यांना घरे तर दिड एकर जागेवर इतर जनतेला घरे उपलब्ध करुन देण्याचा मानस उदय सामंत यांनी व्यक्त केला. यासाठी लॉटरी काढण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. अर्कीटेक्ट नेमेण, लेआऊट काढणे इ. प्रक्रीया लवकर करावी अशा सूचना त्यांनी संबधिताना यावेळी दिल्या.