मुंबई, 21 मे : नव्या स्वरुपातील सामान्य जीवनासाठी ग्राहकांची सेवा करण्याची तयारी करताना एमजी मोटर इंडियाने आज ‘एमजी शील्ड+’ प्रोग्रामची घोषणा केली. सेवा आणि विक्रीतील सर्वसमावेशक उपक्रमांपैकी एक असलेले शील्ड+ हे कॉन्टॅक्ट फ्री टेक्नोलॉजी, घरपोच डिलिव्हरी आणि वाढीव स्वच्छतेवर भर देणारे आहे.
संपर्करहीत तंत्रज्ञानाच्या समूहात एमजीने व्हॉइस इंटरॅक्शन ही आणखी एक डिजिटल सेवा आणली आहे. या क्षेत्रातील अग्रगण्य अशा एमजी व्हीपीएचवाय हे तंत्रज्ञान शील्ड+मध्ये समाविष्ट आहे. यात वाहनांना आवाजानुसार मार्गदर्शन केले जाईल. ग्राहक एमजी कारच्या शोरुमपर्यंत येऊ शकतात. त्यानंतर त्यांना आवाजी सूचनांनुसार ऑटोमॅटिक मार्गदर्शन मिळते. उत्पादन पाहताना ग्राहक क्यू आर कोड स्कॅन करुन आवाजी मार्गदर्शनाद्वारे वाहनातील सुविधांची प्रात्यक्षिके पाहू शकतो.
संपर्करहीत संच देताना एमजी मोटर इंडिया सर्वप्रथम ओटीए (Over-The-Air) एमजीकारच्या इन्फोटेनमेंट सिस्टिमवर अपडेट्स देईल. ग्राहकांना ही सुविधा मिळण्यासाठी त्यांना एमजीच्या आय स्मार्ट इन्फोटेनमेंट सिस्टिमवरील सॉफ्टवेअर अपडेट करावे लागेल. यासाठी सर्व्हिस स्टेशनला भेट देण्याची गरज नाही.
एमजी मोटर इंडियाचे प्रमुख कमर्शिअल ऑफिसर गौरव गुप्ता म्हणाले की, ‘दूरदृष्टी ठेवणारा ब्रँड या नात्याने, आम्ही ग्राहकांना अधिक चांगला अनुभव देण्यासाठी सतत नूतनाविष्कारावर भर देतो. नव्या युगात डिजिटल आणि संपर्कहीन अनुभव महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. शील्ड+ हा एकछत्री विक्री आणि सेवा देणारा उपक्रम असून नव्या समान्य जीवनातील ग्राहकांची सोय व्हावी, हा त्यामागील उद्देश आहे. ग्राहकांची सुरक्षा या आमच्या तत्त्वाशी आम्ही वचनबद्ध आहोत. नूतनाविष्कार आणि तंत्रज्ञान हे दोन एमजीचे मुख्य आधारस्तंभ आहेत. यावरच उपक्रम आधारलेला असल्याने ग्राहकांना उच्च दर्जाचा अनुभव मिळेल.’