मुंबई, 17 मे : मोठ्या प्रमाणावर समाजाची सेवा करण्यासाठी वचनबद्ध असलेल्या एमजी मोटर इंडियाने एमजी नर्चर प्रोग्रामची घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणावर लक्ष केंद्रीत करणारा, हा अशा प्रकारचा पहिलाच प्रोग्राम आहे. या उपक्रमाद्वारे जवळपास २०० विद्यार्थ्यांना मार्केटकेंद्रीत कौशल्ये शिकवली जातील व भविष्यासाठी त्यांना तयार केले जाईल.
सध्याच्या कसोटीच्या आणि वाढीव लाकॅडाउनच्या काळात एमजी मोटर इंडियाच्या उपक्रमामागील उद्देश विद्यार्थी समुदायाला कौशल्ये शिकवण्याचे आहे. जेणेकरून भविष्यात करिअरसाठी त्याचा वापर होईल. तसेच याबदल्यात कारनिर्माता कंपनीला देशातील तरुणाईकडून आणखी रचनात्मक आणि नवीन कल्पनांचा फायदा होईल. एमजी नर्चर प्रोग्रामसाठी स्क्रीनिंग टेस्टमध्ये ‘कॉलेजदेखो’ आपल्या इकोसिस्टिमद्वारे आधार देईल. इव्ह्यूमी या दुस-या एका स्टार्टअपचे सहकार्य लाभलेल्या या उपक्रमात इंडस्ट्री फर्स्ट, रोबोटिक सिलेक्शन प्रोसेस असेल. उच्च शिक्षणासाठी काही शिष्यवृत्ती देण्याचा विशेष आकर्षक पैलूदेखील या उपक्रमात आहे.
एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबा म्हणाले, “सध्याच्या काळात एमजी नर्चर प्रोग्रामद्वारे आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू. तसेच त्यांना भविष्यातील बाजाराच्या दृष्टीने समर्थ करू. हा प्रोग्राम जूनपासून सुरु होऊन, ८ आठवडे चालेल. त्यानंतर त्यातील काही हुशार विद्यार्थ्यांना नोकरीची संधीही देण्याचा आमचा विचार आहे. विद्यार्थ्यांना शिकण्याचा उत्कृष्ट अनुभव देत आपल्या देशात फॉरवर्ड लुकींग टॅलेंट पूल तयार करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.”