मुंबई, ५ मे २०२१: कारनिर्माता एमजी मोटर इंडिया ने आज आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी कोव्हिड-19 लसीकरण मोहीम सुरु केली. ही लसीकरण मोहीम प्रत्यक्ष कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही उपलब्ध आहे. कंपनीने संबंधित अधिकाऱ्यांशी यासाठी भागीदारी केली असून गुरुग्राम आणि हलोल येथील कंपनीच्या प्रादेशिक कार्यालयांशीदेखील संपर्क केला आहे. याद्वारे सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयात मोफत लसीकरण केले जाईल. एमजी मोटर इंडियातर्फे देऊ केलेले लसीकरण हे स्वेच्छा असून कंपनी कर्मचाऱ्यांना लसीकरण करून घेण्याकरिता प्रोत्साहन देत आहे.
‘सुरुवात छान झाली. आमच्या प्रकल्पातील पहिल्या लसीकरण दिनी, आम्ही आमच्या 400 पेक्षा जास्त सदस्यांना संरक्षण दिले. टीमची कामगिरी उत्तम आहे. स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांचेही आभार’, असे ट्वीट एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष व एमडी राजीव छाबा यांनी केले