
प्रातींनिधिक
मुंबई, (निसार अली) : मेट्रो रेल्वे प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मच्छीमार कुटुंबीयांना आर्थिक नुकसान भरपाई न देल्यास कोळी महिला मुख्यमंत्र्यांना घेराव घालतील, असा इशारा महाराष्ट्र मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष महेश भाऊ तांडेल यांनी दिला आहे.
कफपरेड येथील शिवशास्त्री मच्छिमार नगर, कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग येथे कोळी महिला पिढ्यानपिढ्या मासे सुकवण्याचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करत आहेत; परंतु या जागेवर मेट्रो रेल्वेच्या गोदामाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे मासे सुकविणे बंद होऊन कोळी महिलांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.
सरकारने आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर, मेट्रो रेल्वे प्रकल्प अधिकारी आश्विनी भिडे यांकडे लेखी पत्र देऊन करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांना घेराव घालू असे संघटनेकडून सांगण्यात आले,