मुंबई : मेट्रो कॅश अँड कॅरी या भारताच्या आघाडीच्या सुगठित होलसेलर व फुड स्पेशालिस्टने आज ईपेलेटर या फिनटेक स्टार्टअपशी खास भागीदारी जाहीर केली, ज्याचा उद्देश आहे, अधिक किफायती आणि शाश्वत सोल्युशन्सच्या मदतीने किराणा दुकानांचा कायापालट करणे. किराणा डिजिटायझेशन प्रोग्रामच्या पुढील टप्प्याचा एक भाग म्हणून मेट्रोने ईपेलेटरच्या सहयोगाने ‘डिजिटल शॉप’ या मोबाइल अॅप्लिकेशनची निर्मिती केली आहे. या अॅपच्या मदतीने किराणा मालाचा दुकानदार म्हणजे वाणी आपल्या स्मार्टफोनमार्फत कोणत्याही अतिरिक्त गुंतवणुकीशिवाय आपल्या व्यवसाय संचालनाचे तत्काळ डिजिटायझेशन करू शकतो.
ईपेलेटर आणि मेट्रोचे ‘डिजिटल शॉप’ छोटे व्यापारी आणि किराणा व्यापारी यांना त्यांच्या पारंपरिक पद्धती अपग्रेड करून व त्यांच्या व्यवसायाचे आधुनिकीकरण करून टेक्नॉलॉजीचा लाभ घेऊन डिजिटली सक्षम करेल. हे ‘डिजिटल शॉप’ किराणा व्यापा-यांकडून व्यवहार करण्याबद्दल शुल्क आकारात नाही, त्यांना एक सार्वत्रिक क्यूआर कोड देतो, ज्याच्या द्वारे सर्व अॅप वरून पेमेंट ते स्वीकारू शकतात. तसेच दैनिक व मासिक व्यवहारांवर यात कोणतीही मर्यादा नाही. या शिवाय, ‘डिजिटल शॉप’अॅपच्या मदतीने किराणा दुकानदार आपल्या ग्राहकांना उधार देऊ शकतात तसेच अॅप वर काही क्लिक करून व्यवसायासाठी व्याजमुक्त कर्ज मिळवू शकतात. याच्यामुळे या व्याप-यांचे भांडवल मोकळे राहील आणि व्यवसाय अधिक नफा देईल.
ईपेलेटर चे सह-संस्थापक अक्षत सक्सेना म्हणाले, “मेट्रो कॅश अँड कॅरीच्या मदतीने आम्ही टेक्नॉलॉजी आणि अॅनालिटिक्सचा उपयोग करून विविध पद्धती उभारण्याचा प्रयत्न करत आहोत. याचा उपयोग करून किराणा व्यापारी व एसएमई त्यांचा व्यवसाय अधिक सक्षमतेने व नफाकारक रीतीने करू शकतील. लघु आणि स्वतंत्र किराणा व्यापा-यांना सक्षम करण्याचा आमचा आणि मेट्रोचा उपागम सारखाच आहे, शिवाय आम्हाला वाटते की, देशात उद्योजकतेचे वातावरण वाढवण्याचे काम ते करत आहेत. येत्या दोनेक महिन्यात देशभरात या उपक्रमाला वेग देण्यास आम्ही उत्सुक आहोत.”