पुणे : मर्सिडीज-बेंझ या भारतातील सर्वात मोठ्या आलिशान कार उत्पादक कंपनीने आज नवीन जीएलएस ही सर्वात मोठी व सर्वाधिक आलिशान एसयूव्ही सादर केली. या श्रेणीला ‘एसयूव्ही’मधील ‘एस-क्लास’ म्हणून ओळखले जाते. ‘नवीन मर्सिडीज-बेंझ जीएलएस’ ही ‘मर्सिडीज बेंझ’ची सर्वात मोठी आणि सर्वात आलिशान एसयूव्ही आहे. ग्राहकांना या गाडीमध्ये अधिक जागा, अधिक आराम, अधिक तंत्रज्ञान आणि अधिक आलिशानपणा मिळू शकणार आहे. भारतीय रस्त्यांवर धावणाऱ्या इतर कोणत्याही ‘एसयूव्ही’मध्ये नसतील अशी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त वैशिष्ट्ये ‘नवीन जीएलएस’मध्ये आहेत. हे खरोखरीच ‘ऑफ-रोडर’ वैशिष्ट्ये असलेले आलिशान स्वरुपाचे वाहन आहे. ‘नवीन जीएलएस’मधील अंतर्गत रचना व सजावट ही ‘मर्सिडीज-बेंझ लक्झरी सलून’सारखी आहे, तसेच ‘एसयूव्ही’सारखा दणकटपणा व आरामही यामध्ये जाणवतो. ‘नवीन जीएलएस’मध्ये तिच्या पूर्वीच्या श्रेणीपेक्षा मोठा व्हीलबेस (3135 मिमी, 60 मिमीने जास्त) दिलेला असून आतील जागाही जास्त (87 मिमी) आहे. विशेषत: दुसर्या रांगेतील सीट्ससाठी ही जादाची जागा उपलब्ध आहे आणि सीट मागेपुढे करून ती जुळवूनही घेता येते.
‘मर्सिडीझ-बेंझ इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन श्वेंक यांनी पुण्यातील चाकण येथील कंपनीच्या ‘सेंटर ऑफ एक्सलंस’मध्ये ‘जीएलएस’चे औपचारिक उद्घाटन डिजिटल पद्धतीने केले. ते याप्रसंगी म्हणाले, “आलिशानपणा, आराम आणि तंत्रज्ञान यांचा संयोग असलेली मर्सिडीज-बेंझ जीएलएस आज बाजारात उपलब्ध असलेली सर्वात चांगली आलिशान एसयूव्ही आहे. पूर्ण आकाराच्या, सात-सीटर असलेल्या या ‘नवीन जीएलएस एसयूव्ही’मध्ये सर्वच प्रवाशांना ऐसपैस जागा मिळते; विशेषतः दुसर्या रांगेत बसणाऱ्यांसाठी अधिक जागा आणि अतिरिक्त लेगरूम आहे. ‘जीएलएस’मध्ये अत्याधुनिक स्वरुपाची ‘एमबीयूएक्स इंफोटेनमेंट सिस्टीम’ आहे, त्याशिवाय ‘मर्सिडीज मी कनेक्ट सर्व्हिस’द्वारे ती पूर्णपणे कनेक्टेड आहे. त्यामुळे ती ‘टेक्-सॅव्ही एसयूव्ही’ बनली आहे. ‘जीएलएस’चा अंतर्गत भाग आधुनिक, विलासी सौंदर्यशास्त्र आणि एसययूव्हीचा हॉलमार्क यांचा अनोखा संगम आहे. आमच्या मते, नवीन जीएलएस ही ‘ऑफ-रोडर’च्या वैशिष्ट्यांसह आधुनिक लक्झरीचे एक आदर्श मिश्रण आहे.”
“मर्सिडीज मी कनेक्ट अॅप’ला एक नवीन यूजर इंटरफेस आणि एक अतिरिक्त नवीन सर्व्हिस अॅप देखील जोडण्यात आलेले आहे. यातून प्रवाशांना अखंड ऑनलाइन अनुभव मिळत राहतील. येत्या 1 जुलै 2020 पासून ‘मर्सिडीज मी कनेक्ट’ घेतलेल्या सर्वांना ‘यूझर इंटरफेस’सह नवीन ‘मर्सिडीज मी अॅप’ पुरविले जाणार आहे. या नवीन अॅपमध्ये नवी वैशिष्ट्ये देऊ करणारा प्लॅटफॉर्म असेल. ही वैशिष्ट्ये ‘ओव्हर द एअर’ अपडेट होऊ शकतील. आम्ही लवकरच जिओ-फेंसिंग, वाहन शोधक आणि रिमोटद्वारा खिडक्या व सनरूफ चालू वा बंद करण्याची सुविधा सादर करणार आहोत,’’ अशी माहिती श्वेंक यांनी दिली.
“एमबीआरडीआय’मधील आमच्या सहकाऱ्यांनी स्थानिक पातळीवरील माहितीशी सांगड घालून एक प्रणाली विकसीत केली आहे. यामुळे ‘एमबीयूएक्स एनटीजी-6 हेड युनिट्स’च्या माध्यमातून ‘नेव्हीगेशन पेन’वर कोविडच्या चाचण्यांची केंद्रे दिसू शकणार आहेत. या नावीन्यपूर्ण संशोधनामुळे, मर्सिडीज-बेंझ कंपनी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन ग्राहकांना किती वेगाने सेवा देऊ शकते व कशी मदत करू शकते, हे अधोरेखित होते. यासाठीचा डेटा दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद आणि पुण्यासह सर्व प्रमुख शहरांसाठी उपलब्ध असेल. ही सुविधा ‘मॅप माय इंडिया’च्या सहकार्याने आणण्यात आली आहे.”
पॉवरट्रेनः पेट्रोल इंजिनमध्ये आहे एकात्मिक स्टार्टर-जनरेटर आणि ‘इक्यू बूस्ट’
आलिशान वाहने चालविणे सुखदायक ठरावे आणि त्यास सहजपणे शक्ती मिळावी, यासाठी सामर्थ्यवान असे सहा सिलेंडरचे इंजिन देण्यात येत असते. यांसारख्या वाहनांचे ते प्रमुख वैशिष्ट्यच ठरते. तथापि, ‘मर्सिडीज-बेंझ जीएलएस 450 4मॅटिक’मध्ये सहा-सिलेंडर इन-लाइन इंजिनसह 48-व्होल्ट तंत्रज्ञान आणि इंटिग्रेटेड स्टार्टर-जनरेटर (आयएसजी) यांचाही समावेश आहे. त्याचा कार्यप्रदर्शन डेटा पुढीलप्रमाणे – 270 केडब्ल्यू (367 एचपी) आणि 500 एनएम टॉर्क, तसेच पुढील 250 एनएमटॉर्क व 16 केडब्ल्यू / 22 एचपी उपलब्ध. इंटिग्रेटेड स्टार्टर-जनरेटर (आयएसजी) हा इक्यू बूस्ट किंवा ऊर्जेची भरपाई करतो, त्याचबरोबर इंधनाचीही बचत करतो. हे उपकरण यापूर्वी उच्च व्होल्टेज असलेल्या हायब्रिड तंत्रज्ञानासाठी वापरले जात असे.
एअरोडायनॅमिक्स: या वर्गातील सर्वोत्कृष्ट सीडी आकड्यांसाठी तपशीलवार ‘फाइन-ट्यूनिंग’
नवीन जीएलएस गाडी 0.32 पर्यंतची सीडी आकडेवारी साध्य करते. मोठ्या आलिशान एसयूव्ही श्रेणींमध्ये इतकी कमी सीडी आकडेवारी क्वचितच मिळते. यापूर्वीच्या श्रेणीमध्ये हा आकडा सीडी 0.35 इतका असे. उत्कृष्ट ‘एअरोडायनॅमिक्स’मुळे गाडीमध्ये इंधनाचा वापर कमी होतो आणि दुसरे म्हणजे, गाडीला वाऱ्याचा अडथळा कमी होतो. या वैशिष्ट्यासाठी कंपनीच्या संशोधकांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते.
इंजिनांची नवीन श्रेणी: प्रभावी कार्यक्षमता
स्पेसिफिकेशन्स | जीएलएस 400 डी 4मॅटिक | जीएलई 450 4मॅटिक (इक्यू बूस्ट) |
सिलिंडर्स / व्यवस्था | ओएम 656 बीएस-6 इनलाइन / 6 सिलिंडर | एम 256 बीएस-6 इनलाइन / 6 सिलिंडर |
डिस्प्लेसमेंट (सीसी) | 2,925 | 2,999 |
आऊटपुट (केडब्ल्यू / एचपी) कंबश्चन इंजिन | 243 / 330 | 270/367 (+ 16 केडब्ल्यू / 22 एचपी) |
पीक टॉर्क कंबश्चन इंजिन (एनएम) |
700 | 500 (+ 250 एनएम) |
0-100 स्प्रिंट | 6.3 | 6.2 |
सुरक्षा
- 360 अंशांत फिरणाऱ्या दृश्य कॅमेर्यासह पार्किंगचे साहाय्य
- चालक सहाय्यक प्रणाली: ‘ब्लाइंड स्पॉट-असिस्ट’ आणि ‘अॅक्टिव ब्रेक असिस्ट’
- नऊ एअरबॅग्ज
- डाउनहिल स्पीड रेग्युलेशन (डीएसआर)
- ‘ऑफ-रोड एबीएस’
- ‘कार वॉश फंक्शन’
अंतर्गत रचना व सुविधा
- 64 रंगांच्या अॅंबियन्ट लाइटिंगसह ‘एक्स्प्रेशन इंटर्नल पॅकेज’
- ‘हाय-ग्लॉस अँथ्रासाइट लाईम वूड ट्रिम’
- नेपा लेदरने सजवलेले सर्व नवीन सुविधांसह स्पोर्ट्स स्टिअरिंग व्हील
- ‘सीट कायनेटिक्स’सह मेमरी पॅकेज फ्रंट
- ‘थर्मोट्रॉनिक 5-झोन’ स्वयंचलित हवामान नियंत्रण
- एक्स्टेंडेड सेंटर कन्सोल आणि लक्झरी हेड रिस्ट्रेंट यांसह रीअर कम्फर्ट पॅकेज प्लस
- मागील दारांवर ‘इलेक्ट्रिक सन ब्लाइंड्स’
- पुढील प्रवासी सीटचे नियंत्रण मागील बाजूने करण्याची सुविधा
- दुसऱ्या रांगेतील सीट्स मागे-पुढे करण्यासाठी इलेक्ट्रिकल नियंत्रण
- दुसऱ्या व तिसऱ्या रांगांतील सीट्सची बॅकरेस्ट दुमडण्यासाठी ‘इलेक्ट्रिकल वन-टच’ नियंत्रण
- तिसर्या रांगेतील सीटकडे जाण्यासाठी सुलभ प्रवेश
- अवजड सामान उतरविण्यासाठी ‘एअरमॅटिक लेव्हल कंट्रोल’
- ‘इझी-पॅक टेलगेट आणि लगेज कव्हर’
टेलीमॅटिक्स आणि इन्फोटेनमेंट:
- बर्मेस्टर® सराउंड साउंड सिस्टीम
- 31.2 सेमी (12.3 ”) x 2 वाइडस्क्रीन कॉकपिट विथ टच
- “हे मर्सिडीज” आणि ‘एचडीडी नॅव्हिगेशन (3 डी)’ यांसह एमबीयूएक्स मल्टीमीडिया सिस्टीम (एनटीजी 6)
- ‘एमबीयूएक्स इंटिरिअर असिस्टंट’ – कॉन्टॅक्टलेस गेस्चर कंट्रोल
- मागील सीट्ससाठी करमणूक प्रणालीचे प्री-इन्स्टॉलेशन
- वायरलेस चार्जिंग (समोरील आणि मागील)
- एमबीयूएक्स रीअर टॅब्लेट (मागे घेण्यायोग्य)
- मागील बाजूस अतिरिक्त ‘यूएसबी पोर्ट’
- ‘मर्सिडीज मी कनेक्ट’
‘नवीन जीएलएस’मध्ये ‘कनेक्टेड कार’ तंत्रज्ञान:
नवीन जीएलएस सादर करतानाच ‘मर्सिडीज-बेंझ इंडिया’तर्फे कनेक्टेड कार तंत्रज्ञानाचा एक नवीन पैलू जाहीर करण्यात येत आहे. ‘मर्सिडीज मी कनेक्ट अॅप’ला एक यूजर इंटरफेस आणि एक नवीन ‘मर्सिडीज मी सर्व्हिस अॅप’ जोडण्यात येत आहे. या माध्यमातून ऑनलाइन अपॉइंटमेंट बुकिंगची सुविधा अखंडपणे मिळू शकते. नवीन इंटरफेस शार्प आणि वापरण्यास सुलभ आहे, तसेच नवीन ‘मॅप इंटरफेस रंगीत 3 डी नकाशा लेआउट’सह आला आहे. त्यात कार अनलॉक करण्यासाठी ‘बायोमेट्रिक आयडी अॅक्सेस’देखील आहे. ‘मर्सिडीज मी अॅप’ केवळ दिसायलाच चांगला नाही, तर तो कोठेही ठेवलेला असला, तरी ग्राहकांशी नेहमीच संपर्कात असतो. येत्या 1 जुलै 2020 पासून ‘मर्सिडीज मी कनेक्ट’ घेतलेल्या सर्वांना ‘यूझर इंटरफेस’सह नवीन ‘मर्सिडीज मी अॅप’ पुरविले जाणार आहे. ग्राहकांना त्यांच्या सध्याच्या अॅपवर सूचना मिळाल्यानंतर त्यांना विद्यमान ‘एमएमसी अॅप्स’ अपग्रेड करून घ्यावे लागेल, इतकेच.
नवीन ‘मर्सिडीज मी कनेक्ट’ची वैशिष्ट्ये : सर्व विद्यमान मर्सिडीज मालकांना फायदेशीर
- ‘जीएलएस’चे सर्व ग्राहक आणि मर्सिडीजचे विद्यमान ग्राहक यांना नवीन आणि रोमांचक एमएमसी वैशिष्ट्ये ‘ओटीए’द्वारा प्राप्त होतील.
- जिओफेन्सिंग: कारच्या संचारासाठी परिमिती निश्चित केल्यावर त्यासंबंधीच्या सूचना मिळतील.
- कोठूनही दूरस्थपणे कारच्या खिडक्या उघडणे आणि बंद करता येणे.
- वाहन शोधक: कारचे हॉर्न वाजवते आणि दिवे चमकवते.
‘एमबीयूएक्स’द्वारे ‘नेव्हिगेशन सिस्टीम’वर कोरोना चाचणी केंद्रे:
‘एमबीयूएक्स’सह ‘एनटीजी 6 नेव्हिगेशन सिस्टीम’मध्ये आता ग्राहकांच्या स्वारस्यातून कोरोना चाचणी केंद्रेही दर्शविली जातील. सर्व ‘मर्सिडीज-बेंझ एमएमसी’चे ग्राहक आता ‘नेव्हीगेशन’मध्ये पीओआय म्हणून कोविड-19ची चाचणी केंद्रे शोधू शकतात. कोरोना चाचणी केंद्रांची दिशा दर्शविण्यासदेखील एमबीयुएक्स सक्षम असेल.
बंगळुरू येथील एमबीआरडीआय अभियंत्यांनी मॅपमायइंडिया या नकाशांविषयक सेवा देणाऱ्या आघाडीच्या संस्थेच्या सहकार्याने ही प्रगती साधली आहे.
हा डेटा दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद आणि पुण्यासह सर्व प्रमुख शहरांसाठी उपलब्ध असेल.