२०२१ साठी ठरवून देण्यात आलेल्या सर्व कार लॉन्चच्या आधीच विकून रचला नवा विक्रम
‘मर्सिडीझ-मेबॅच जीएलएस ६०० ४मॅटिक‘ बाजारपेठेत दाखल केली जाण्याच्या आधीच सर्व ५०+ कारची बुकिंग पूर्ण झाली आहे.
‘मर्सिडीझ-मेबॅच जीएलएस ६०० ४मॅटिक‘ चा पुढील सेट कस्टमाइज करून २०२२ च्या पहिल्या तिमाहीपर्यंत ग्राहकांना त्यांच्या कार सुपूर्द केल्या जातील.
- ‘मर्सिडीझ-मेबॅच जीएलएस ६०० ४मॅटिक‘ ही या ब्रँडची अल्ट्रा-लक्झरियस ‘मर्सिडीझ-मेबॅच‘ श्रेणीमध्ये प्रस्तुत करण्यात आलेली पहिली एसयुव्ही आहे.
- गाडीच्या आत विशाल जागा आणि त्यासोबत उच्च दर्जाच्या, अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत.
- अल्ट्रा-कम्फर्टेबल रिक्लायनिंग, पाठीमागे क्लायमटाइज्ड, मसाज सीट्स आहेत.
- या श्रेणीतील आघाडीचे नॉइज इन्स्युलेशन तंत्रज्ञान यामध्ये असल्याने गाडीच्या आत बसल्यावर संपूर्ण शांतता व आरामाचा अनुभव घेता येतो.
- स्टॅंडर्ड एमबीयुएक्स रिअर सीट टॅबलेटमुळे प्रवाशांना आराम आणि मनोरंजनाची फंक्शन्स अंतर्ज्ञानानुसार नियंत्रित केली जाण्याची सुविधा मिळते.
- संपूर्णपणे एकात्मिक व्हील बोल्ट कव्हर्ससहित स्टॅंडर्ड ५५.९ सेमी (२२ इंच) मेबॅच मल्टी-स्पोक लाईट-अलॉय व्हील्स कारला अनोखा डिझाईन कोशंट मिळतो.
- ‘मर्सिडीझ-मेबॅच जीएलएस ६०० ४मॅटिक‘ च्या किंमती २.४३ कोटी रुपयांपासून सुरु होतात. (एक्स-शोरूम, भारत)
पुणे: देशातील सर्वात मोठी लक्झरी गाड्यांची कंपनी मर्सिडीझ-बेंझने मेबॅच श्रेणीतील पहिल्या एसयुव्हीसोबत अल्ट्रा-लक्झरियस एसयुव्ही विभागात पाऊल ठेवले आहे. शानदार व अनोख्या वैशिष्ट्यांसह, मर्सिडीझ-मेबॅच ‘अल्टिमेट लक्झरी’ अर्थात सर्वोत्तम शान व आराम सर्वात आधुनिक व अस्सल रूपात प्रस्तुत करते. ‘मर्सिडीझ-मेबॅच जीएलएस ६०० ४मॅटिक’ भारतात लक्झरी एसयुव्ही विभागात संपूर्णपणे नवा मापदंड स्थापित करत आहे. अतिशय सुंदर आणि शानदार वैशिष्ट्यांनी व सुविधांनी परिपूर्ण अशी ही कार अतुलनीय आहे.
पहिली मेबॅच एसयुव्ही असण्याबरोबरीनेच जीएलएस मेबॅच ६०० हे भारतीय बाजारपेठेत आणले जात असलेले, मर्सिडीझ-मेबॅच एस-क्लासनंतरचे दुसरे मेबॅच मॉडेल आहे. ऑटोमोटीव्ह इंजिनीयरिंग, सेवा आणि ऍक्सेसरीजमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, अनोखी लक्झरी आणि जास्तीत जास्त आराम यांचे दुसरे नाव म्हणजे मर्सिडीझ-मेबॅच ब्रँड.
‘मर्सिडीझ-मेबॅच जीएलएस ६०० ४मॅटिक‘
एकमेवाद्वितीय अल्ट्रा-लक्झरी एसयुव्ही भारतात लॉन्च करण्याबाबत मर्सिडीझ-बेंझ इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ मार्टिन श्वेन्क यांनी सांगितले, “मर्सिडीझ-मेबॅच जीएलएस ६०० ४मॅटिक भारतात दाखल करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. मेबॅच ब्रँड उत्कृष्ट लक्झरीचे प्रातिनिधीत्व करतो आणि ही एसयुव्ही ग्राहकांना मिळणारा अनुभव अविश्वसनीय स्तरापर्यंत वाढवते. आधीच्या काळातील अभिजात मोहकता आणि सर्वात जास्त आराम यांचा अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबत मेळ घालत कारच्या लक्झरी अनुभवाची नवी व्याख्या ही एसयुव्ही सादर करत आहे. मर्सिडीझ-मेबॅच जीएलएस ६०० ४मॅटिक आणून आम्ही भारतात एसयुव्हीसोबत लक्झरी मोटारींगचा संपूर्णतः नवा अनुभव सादर करत आहोत. हे शानदार मॉडेल ज्यांना विशेष आवडले अशा उंची आवड व समज असणाऱ्या, चोखंदळ ग्राहकांना ही एसयुव्ही सुपूर्द करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.”
श्वेन्क यांनी पुढे सांगितले, “आमच्या उत्पादनांना खूप चांगली मागणी मिळत आहे, त्यावरून आम्ही समजू शकतो की, आमच्या ग्राहकांच्या आशा आणि महत्त्वाकांक्षा प्रबळ आहेत. आता देशात अनेक बाजारपेठा खुल्या होत आहेत आणि आम्ही देखील ग्राहकांकडून दर्शवल्या जात असलेल्या सकारात्मकतेसह आमच्या व्यवसायाला टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरुवात करत आहोत. आमचे २०२१ चे उत्पादन धोरण योग्य दिशेने वाटचाल करत आहे आणि आम्हाला आशा आहे की मागणीमध्ये, खासकरून टॉप-एन्ड उत्पादनांच्या मागणीमध्ये अधिक जास्त वाढ होत राहील. सध्या बाजारपेठांमध्ये सकारात्मक वातावरण आहे आणि आम्ही पूर्ण उत्साहानिशी पुढे जात आहोत. येणाऱ्या काही महिन्यांमध्ये आम्ही आमच्या ग्राहकांसाठी अनेक नवी उत्पादने सादर करत राहू.”
लक्झरीचा नवा मापदंड:
स्टाईल आणि स्टेटस यांची सर्वोत्तम व्याख्या ‘मर्सिडीझ-मेबॅच जीएलएस ६०० ४मॅटिक’ मर्सिडीझ-बेंझ ग्राहकांसाठी लक्झरी एसयुव्हीमध्ये नवा मापदंड प्रस्तुत करत आहे.
फर्स्ट-क्लास प्रायव्हेट जेटप्रमाणे इंडिविज्युअल रिअर सीट्स*:
- ४३.५ अंशात रिक्लाईन आणि १२० एमएमपर्यंत पुश बॅक होऊ शकतात.
- मेमरीसह इलेक्ट्रिकल ऍडजस्टमेन्ट, इलेकट्रीकली वाढवली जाऊ शकणारी लेग रेस्ट
- रिअर कम्फर्ट पॅकेजची आधुनिक वैशिष्ट्ये, शोफर फंक्शन, क्लायमटाईज्ड आऊटर सीट्स
- मसाज फंक्शनसोबत मल्टीकाँटूर सीट्स, वायरलेस चार्जिंग, एमबीयुएक्स रिअर टॅबलेट
- प्री-सेफ® फंक्शन
पाठीमागे फोल्डिंग टेबलची सुविधा*:
- पाठीमागील दोन फोल्डिंग टेबल्स फर्स्ट-क्लास रिअर सूटमध्ये बदल करून काम करण्यासाठी आरामशीर जागा तयार केली जाऊ शकते.
- स्टोवेज ट्रेमध्ये नोटबुक्स किंवा कागदपत्रे ठेवली जाऊ शकतात. शानदार वातावरणाला साजेसे दिसण्यासाठी त्यांना उच्च दर्जाच्या लेदरचे फिनिशिंग देण्यात आले आहे.
रेफ्रिजरेटेड कम्पार्टमेन्ट*:
रिअर आर्मरेस्टमध्ये रेफ्रिजरेटेड कम्पार्टमेन्ट व्यवस्थित सामावले गेले आहे. यामध्ये हे पर्याय आहेत.
- इंटिरियर लायटिंग
- दोन शॅम्पेन फ्ल्यूटससाठी माउंटिंगचा पर्याय
विशेष मेबॅच ड्राईव्ह प्रोग्राम:
मर्सिडीझ-मेबॅचमध्ये एअरमॅटिक एअर सस्पेन्शन आणि अडॅपटिव्ह डम्पिंग सिस्टिम प्लस (एडीएस+) स्टॅंडर्ड म्हणून देण्यात आले आहे. सस्पेन्शन आणि पॉवरट्रेनसाठी विशेष मेबॅच ड्राईव्ह प्रोग्राम पाठीमागील प्रवाशांना सर्वोत्तम आरामदायी प्रवासाचा आनंद मिळवून देतो. स्टॅंडर्ड एमबीयुएक्स रिअर सीट टॅबलेट त्यांना पाठीमागील सीटवरूनच आराम आणि मनोरंजन फंक्शन्स अंतर्ज्ञानानुसार नियंत्रित केली जाण्याची सुविधा देते.
ई-ऍक्टिव्ह बॉडी कंट्रोल*
ई-ऍक्टिव्ह बॉडी कंट्रोल ड्रायव्हिंगचा अनुभव अधिक चांगला बनवते, तसेच प्रवाशांना जाणवणारा वेगाचा प्रभाव कमीत कमी राखते. प्रत्येक स्थिती व्यवस्थित हाताळण्याची क्षमता असलेल्या या कारमध्ये आराम आणि प्रभाव यांचा व अनोख्या ऑफ-रोड वैशिष्ट्यांसह मेळ साधला गेला आहे. या कारमध्ये प्रवासी व ड्रायव्हर आधुनिक, संपूर्णपणे सक्रिय सस्पेन्शनच्या प्रथम श्रेणीच्या प्रभावाचा अनुभव घेतात, ज्यांना सर्व पीच, रोल आणि शॉक्स यांपासून वाचवण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे.
यामध्ये ग्राहकांना तीन नवीन फंक्शन्सचे लाभ मिळतात – रोड सरफेस स्कॅन, ऍक्टिव्ह कर्व्ह टिल्टिंग फंक्शन कर्व्ह आणि रिकव्हरी मोड
तंत्रज्ञान वैशिष्ट्ये: मर्सिडीझ-बेंझ जीएलएस ६०० ४मॅटिक | |
इंजिन | वी8 |
डिस्प्लेसमेंट | 3982 सीसी |
रेटेड आउटपुट | 6000-6500 आरपीएम ला 410 केडब्ल्यू (557एचपी) |
इक्यू बूस्ट सहित अतिरिक्त आउटपुट | 16 केडब्ल्यू (22एचपी) |
रेटेड टॉर्क | 2500-4500 आरपीएम ला 730 एनएम |
इक्यू बूस्ट सहित अतिरिक्त टॉर्क | 250 एनएम |
अक्सेलरेशन 0-100 किमी/तास | 4.9एस |
सर्वात जास्त वेग | 250 किमी/तास |
लांबी/रुंदी/उंची (एमएम) | 5205/2030/1838 |
व्हीलबेस (एमएम) | 3135 |
मर्सिडीझ-बेंझ जीएलएस ६०० ४मॅटिकची डिजायनो लिस्ट (पर्यायी):
डिजायनो पेंट्स | मेबॅच डुअल-टोन पेंट्स | डिजायनो लेदर पॅकेज | डिजायनो एक्सक्लूसिव लेदर पॅकेज | 23-इंच (58.4 सेमी) मेबॅच मल्टी-स्पोक लाइट-अलॉय व्हील्स | अर्बन गार्ड प्रोटेक्शन पॅकेज | हेड अप डिस्प्ले | मॅजिक विजन कंट्रोल | एनर्जाइज़िंग पैकेज | एनर्जाइज़िंग पैकेज प्लस | रेफ्रिजेरेटेड कम्पार्टमेंट | पाठीमागे फोल्डिंग टेबल | लक्झरी इंडिविजुअल सीट्स | ई-एक्टिव बॉडी कंट्रोल | एमबीयूएक्स रीयर एंटरटेनमेंट सिस्टम | बर्मेस्टर हाय-एंड 3डी सराउंड साउंड सिस्टम | प्री-सेफ® इंपल्स साइड सोबत ड्राइवर असिस्टेंस पॅकेज प्लस
रस्त्यावरील सर्वाधिक सुरक्षित एसयुव्हीपैकी एक:
ड्राइविंग असिस्टेंस पॅकेज:
ऍक्टिव्ह डिस्टन्स असिस्ट डिस्ट्रॉनिक | ऍक्टिव्ह लेन कीपिंग असिस्ट | ऍक्टिव्ह ब्लाइंड स्पॉट असिस्ट | ऍक्टिव्ह ब्रेक असिस्ट | ऍक्टिव्ह स्टीयरिंग असिस्ट
इतर सुरक्षा वैशिष्ट्ये:
अडाप्टिव हाय बीम असिस्ट प्लस | अडाप्टिव एलईडी टेल लाइट्स | 8 एयरबॅग्स | टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम | 360 डिग्री कॅमेऱ्यासह पार्किंग पॅकेज | इलेक्ट्रॉनिक ट्रैक्शन सिस्टम 4ईटीएस (4मैटिक+) | डाउनहिल स्पीड रेगुलेशन (डीएसआर) | ऑफ-रोड ड्राइविंग मोड | प्री-सेफ® सिस्टम | मर्सिडीझ-बेंझ इमर्जन्सी कॉल सिस्टम | कारवॉश मोड | अटेंशन असिस्ट | रिट्रक्टेबल मेबॅच रनिंग बोर्ड
जीएलएस मेबॅच ६०० ४एम मधील अपहोल्स्ट्री पर्याय:
- ब्लॅक नाप्पा लेदर स्टैंडर्ड
- नाप्पा लेदर – महोगनी ब्राउन/मच्चिएतो बेज स्टैंडर्ड
- नाप्पा लेदर – डिजायनो क्रिस्टल व्हाईट/सिल्वर ग्रे पर्ल पर्यायी
जीएलएस मेबॅच ६०० ४एम मधील ट्रिम पर्याय:
- एन्थ्रेसाइट ओपन पोर ओक वुड ट्रिम स्टैंडर्ड
- ब्राउन ओपन पोर वालनट वुड ट्रिम स्टैंडर्ड
- डिजायनो हाय-ग्लॉस ब्लॅक फ़्लोइंग लाइन्स पियानो लैकर पर्यायी
डिजायनो हाय-ग्लॉस ब्लॅक लाइट लाइन्स लाइम वुड पर्यायी