लग्नाची खरेदी हा नेहमीच एक आनंददायक अनुभव असतो. वधू असो, तिचे कुटुंबीय असो किंवा त्यांच्याकडचे पाहुणे, प्रत्येकजण लग्नासाठीची विशेष खरेदी करण्यास उत्सुक असतो. भारतातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये विभिन्न स्वरुपाच्या प्रथा-परंपरा आहेत; तथापि सर्व संस्कृतींमध्ये लग्न समारंभात लग्नाच्या पोशाखाला एकससारखेच महत्त्व असते.
सध्याच्या काळात लग्नाची खरेदी ई-कॉमर्स साईट्सवर करण्याकडे अनेकांचा कल दिसून येतो. याचे कारण या साईट्सवर कपड्यांची, वस्तूंची बरीच व्हरायटी असते, विविध प्रकार उपलब्ध असतात, निवडीला मोठा वाव असतो. तसेच घरात बसून शॉपिंग करण्याचा सोयीस्करपणाही मिळतो. आकर्षक ऑफर व किंमती, तसेच दिवसांतील 24 तासांत कोणत्याही वेळी खरेदी करण्याची सुविधा, यांमुळे लोक ऑनलाईन शॉपिंगला प्राधान्य देऊ लागले आहेत.
गेल्या सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत सण व लग्नसराईच्या निमित्ताने लेहेंगा चोळी, कुर्ता सेट, एथनिक गाऊन, शेरवानी आणि एथनिक जॅकेट यांसारख्या स्त्री-पुरूष या दोघांच्याही एथनिक वेअर कपड्यांच्या खरेदीत लक्षणीय वाढ झाल्याचे ‘मीशो’ या भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या ई-कॉमर्स अॅपवर दिसून आले. या कालावधीत, मुलांसाठीच्या एथनिक पोशाखांच्या मागणीतही वाढ झाली. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधून याकरीता सर्वात जास्त ऑर्डर आल्या.
लग्नसराईच्या काळात साड्यांच्या विक्रीतही वाढ झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे, जुलै 2020 पासूनच साड्यांसाठीच्या ऑर्डर्समध्ये वाढ झाली. ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या लग्नाच्या हंगामात गेल्या 2 वर्षांपासून विक्रीमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. ‘मीशो’च्या साईटवर ऑक्टोबरपासून साड्यांच्या विक्रीत तिप्पट वाढ झाली आहे.
महाराष्ट्रातील ग्राहक कॉटन सिल्क, जॉर्जेट, बनारसी सिल्क आणि कॉटन यांसारख्या फॅब्रिक्समधील पार्टी वेअर, पारंपरिक, सेलिब्रिटी-इन्स्पायर्ड आणि वेडिंग वेअर साड्यांना प्राधान्य देतात. प्रिंटेड, जरीने विणलेल्या, एम्ब्रॉयडरी आणि नक्षीदार नमुन्यांच्या साड्यांचे प्रयोग करण्यासही हे ग्राहक प्राधान्य देतात. बहुरंगी, हिरवा, गुलाबी, लाल आणि काळा हे रंग या बाबतीत महाराष्ट्रात अधिक लोकप्रिय आहेत.
आकर्षक पोषाखांना पूरक म्हणून एथनिक दागिने घेण्यालाही महत्त्व असते. अशा दागिन्यांची ‘मीशो’वर होणारी खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या वस्तूंमध्ये ज्वेलरी सेट, मंगळसूत्र, नेकलेस आणि चेन यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, 2021मध्ये टीयर-4 श्रेणीच्या शहरांमधून एथनिक दागिन्यांच्या सर्वाधिक ऑर्डर्स ‘मीशो’ला मिळाल्या आहेत.
आजच्या काळातील ग्राहक डिजिटली-जाणकार आहेत आणि आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुरक्षित साधन म्हणून ते ई-कॉमर्सकडे वळत आहेत.















