ठाणे : ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे निवडणुकीची फक्त औपचारिकता उरली आहे. त्यामुळे आता केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे. महापौरपदासाठी शिवसेनेकडून मीनाक्षी शिंदे तर उपमहापौरपदासाठी रमाकांत मढवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
मुंबईनंतर भाजपाने ठाण्यातही महापौरपदाच्या शर्यतीतून सपशेल माघार घेतली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून मिळालेल्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले, अशी माहिती ठाणे भाजपाचे अध्यक्ष संदीप लेले यांनी दिली आहे. राष्ट्रवादीनेही माघार घेतल्याने महापौरपदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे.