मुंबई : ग्रामीण भागात डायलिसिस सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मेडिकाबाजारने डायलिसिस उत्पादनांच्या संपूर्ण श्रेणीसाठी प्रख्यात आरोग्यनिगा सामग्री निर्माता, निप्रो मेडिकल इंडिया यांच्याबरोबर भागीदारी केली आहे. नेफ्रोलॉजिस्ट, रूग्णालये आणि डायलिसिस सेंटरसाठी प्रत्येकवेळी वापरानुसार भाडे, ईएमआय आधारित पर्याय आणि थेट विक्री पर्यायांद्वारे डायलिसिस मशीन बिझिनेस मॉडेलवर केंद्रीत असलेली ही भागीदारी या दोन्ही कंपन्यांमध्ये याप्रकारची पहिलीच भागीदारी आहे ज्यामुळे डायलिसिस सेंटर उभारण्यासाठी लागणाऱ्या मोठ्या भांडवलाचे प्रमाण कमी करता येईल.
अधिकांश डायलिसिस सेंटर शहरी भागातच केंद्रित आहेत. म्हणूनच या संघटनेचे उद्दीष्ट हे मागणी-पुरवठ्यातील अंतर कमी करणे आहे, विशेषत: देशातील टीअर २ आणि टीअर ३ शहरे आणि ग्रामीण भागात डायलिसिसची सामग्री आणि दर्जेदार रुग्णसेवा पुरवण्यासाठी आरोग्य सुविधा सक्षम करून, डायलिसिस अधिक सुलभ आणि किफायतशीर बनविण्यावर केंद्रित आहे.
मेडिकाबाजारचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक तिवारी म्हणाले, “आरोग्यसेवा उद्योग वेगाने वाढत आहे. तथापि, दुर्दैवाने बऱ्याच लोकांना येणा-या भांडवलाच्या अडचणींमुळे वैद्यकीय आस्थापनांची संख्या पुरेशी झालेली नाही. यामुळे विशेषत: टीअर २-३ शहरे आणि दुर्गम ठिकाणी उपलब्धतेत असमानता निर्माण झाली आहे. वापरानुसार भाडे, भाडे तत्वावरचे मॉडेल आणि ईएमआय पर्याय यासारखे खास व्यवसाय मॉडेल भांडवलाच्या अडचणी सोडविण्यासाठी काळाची गरज आहे. मला आनंद आहे की यासमान बाजार धोरणांसह निप्रो मेडिकल इंडिया आमच्यासोबत जुळली आहे.”