मुंबई, (निसार अली) : ज्येष्ठ सामाजीक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या समर्थनात मालवणीत आज रॅली काढण्यात आली. केंद्र सरकार व मध्य प्रदेश सरकारच्या विरोधात रॅली मध्ये घोषणा देण्यात आल्या. मध्यप्रदेश मधील सरदार सरोवर धरण प्रकल्पामुळे हजारो लोकांचे पुनर्वसन झालेली नाही. पुनर्वसनाची मागणी करत पाटकर उपोषणाला बसल्या होत्या, मात्र पोलिसांनी त्यांना अटक केली. मध्य प्रदेश सरकारच्या कारवाईविरोधात आणि पाटकर यांना समर्थन देण्यासाठी रॅली काढण्यात आली.
घर बचाओ-घर बनाव आंदोलन व आंबोजवाडी विकास समितीने मालवणी गेट क्रमांक ८ आंबोजवाडी येथून मालाड स्थानकापर्यंत काढलेल्या रॅलीत पाटकर समर्थक, कार्यकर्ते व आंबोजवाडीतील शेकडो नागरिक सहभागी झाले होते.