मुंबई ,(निसार अली) : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आप पूर्ण ताकदीने उतरणार, असे प्रतिपादन आम आदमी पक्षाच्या मुंबई प्रभारी प्रीती शर्मा मेनन यांनी केले.
मालवणी प्रवेशद्वार क्रमांक 8 येथे आम आदमीच्या कार्यालयाचे उद्धघाटन प्रीती यांच्या हस्ते झाल.
पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, आम आदमी पार्टी ही सर्वसाधारण लोकांची पार्टी असून या पार्टीने दिल्लीत प्रचंड मतांनी व सर्वात जास्त जागा जिंकून अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात राज्य स्थापित केले. दुसऱ्यांदा सत्ता मिळवली आणि ते फक्त आणि फक्त केजरीवाल यांच्या कामाच्या जोरावर. तसेच दिल्ली सरकारने राज्य सरकार प्रणीत शाळांचा कायापालट करत नागरिकांना वीज, पाणी, आरोग्य तसेच इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याने नागरिकांनी आम आदमी पार्टी ला अभूतपूर्व मतदान करत पुन्हा सत्तेवर निवडून आणले. येणाऱ्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत आप पूर्ण ताकदीने उतरून मुंबईकरांची भ्रष्टाचारापासून सुटका करणार. अंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणार.
दरम्यान, वार्ड क्रमांक 48 चे अध्यक्ष हाजी मक़सूद मुल्ला यांनी ही येणाऱ्या पालिका निवडणूकीसाठी आम आदमी पार्टी सज्ज आहे, अस मत व्यक्त केले
महेश, लार्ज़ी व्हर्गिस, मुबीन शेख, सईद शेख, दानिश शेख व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.