मुंबई़ : मुंबई महापालिकेच्या ॲप आणि संकेतस्थळामुळे नागरिकांसाठीच्या महत्त्वपुर्ण अशा सेवा कार्यक्षम आणि पारदर्शकपणे उपलब्ध होणारआहेत. देशात पहिल्यांदाच अशाप्रकारे अद्ययावत तंत्रज्ज्ञानाचा सेवाक्षेत्रात वापर करण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न अभिनंदनीय आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. मुंबई महापालिकेच्या MCGM 24 x 7या मोबाईल ॲपचा तसेच आणि One MCGM GIS या संकेतस्थळाचा सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर सचिव प्रवीणसिंह परदेशी, नगरविकास विभागाचे प्रधानसचिव नितीनकरीर, महापालिकेच्या बांधकामविभागाचे प्रमुख अभियंता संजयदराडे, एमसीएचआय, क्रेडाई, नरेडको आणि पीईएटीए या बांधकाम व्यवसायाशी संबंधित संघटनांचे प्रतिनीधी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, नागरिकांसाठीच्या प्राधान्यसेवा क्षेत्रात अद्ययावत डिजिटायझेशन आणि तंत्रज्ज्ञानाचा वापर करून घेण्याचा नेहमीच प्रयत्न राहीला आहे. याक्षेत्रात पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणण्याच्या दृष्टीने याबाबी महत्त्वाच्या आहेत. या ॲप आणि संकेतस्थळाच्या माध्यमातून नागरिकांसाठी चांगल्या सेवा देता येणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या रेरा या कायद्यालाही उच्च न्यायालयाने योग्य ठरविले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम क्षेत्रातील पारदर्शकता आणण्याच्या प्रयत्नालाही बळ मिळाले आहे. त्या अनुषंगानेही मुंबई महापालिकेने सुरु केलेल्या सेवा समयोचित ठरल्या आहेत. यासाठी देशात पहिल्यांदाच अशाप्रकारचे ॲप आणिसंकेतस्थळ सुरु केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांसह, या प्रणालींच्या विकासात योगदान देणाऱ्या विविध घटकांचेही अभिनंदन केले. सुरवातीला आयुक्त मेहता यांनी संकेतस्थळ व ॲपच्या वैशिष्ट्यांबाबत तपशीलवार माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते क्लीकद्वारे संकेतस्थळ व ॲपचा प्रारंभ करण्यात आला.