मुंबई – राज्य परिवहन कार्यालयाद्वारे द्रुतगती महामार्गावर १ नंबर लेन मध्ये प्रवास करणारी अवजड वाहने, लेन कटींग करणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, वेगमर्यादेचे उल्लंघन करणे या प्रकारच्या चुकांवर कारवाई करण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
१ डिसेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत परिवहन विभागाद्वारे याबाबतीत जनजागृती मोहीम राबविल्याने मोठ्या प्रमाणावर सकारात्मक परिणाम दिसून आल्याने संघटनेने या मोहीमेचे स्वागत केले आहे.
याबाबतीत वाहनचालकांना मार्गदर्शन करणे, त्यांचे प्रबोधन करण्याच्या उद्देशाने मुंबई बस मालक संघटना सर्व वाहन चालक-मालकांना आवाहन करते की, सर्व वाहतूक नियमांचे योग्यपणे पालन करावे. तसेच अपघातविरहीत रस्त्यांसाठी ही मोहीम यशस्वी करण्यास सहकार्य करावे.