मुंबई : राज्य सरकारने अध्यादेश काढल्यानंतरच गाडीवरील लाल दिवा काढू, अशी भूमिका मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी घेतली आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाने राष्ट्रपती, पंतप्रधानांसह देशभरातील मंत्र्यांना गाड्यांवर लाल दिवा लावण्यास येत्या १ मेपासून बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर महाडेश्वर यांनी हे विधान केले आहे.
केंद्रीय कॅबिनेटचा निर्णय सर्वांनीच मान्य करायला हवा, मात्र त्यासाठी राज्य सरकारने तसा अध्यादेश प्रसिद्ध करायला हवा, असे महापौरांनी म्हटले आहे. सगळ्या भाजप खासदारांनी त्यांची संपत्ती जाहीर करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केले होते. त्यावेळी किती खासदारांनी संपत्ती जाहीर केली? असा प्रश्नच महापौरांनी भाजपला विचारला आहे. तसेच अध्यादेशाचा मुद्दा काढून महापौरांनी भाजपाला आव्हान दिल्याचेही बोलले जात आहे.