रत्नागिरी, (आरकेजी) : मत्स्यगंधा एक्सप्रेसमधील प्रवासी महिलेकडून समारे १ लाख २ हजार ६८६ रूपयांचा मुद्देमाल लांबवल्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून ६९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. आदेश रामबहाद्दर पांडे (२०, मुळ रा. रमपूरा पंडरी, मध्यप्रदेश, सध्या रा. खेड रेल्वेस्टेशन) आणि रविंद्र सरोपंत पांडे (२८, रा. मध्यप्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
६ नोव्हेंबर रोजी जॅक्सन फॅलीक्स क्रास्टा (२६, रा. कांजूर मार्ग पूर्व मुंबई) या मत्स्यगंधा एक्सप्रेसने मंगलोर ते मुंबई असा प्रवास करत होत्या. त्यांची रेल्वे रात्री १२.३० वा. सुमारास रत्नागिरी रेल्वेस्टशनवर थांबली असता, अज्ञाताने त्यांची सोन्याचे दागिने असलेली पर्स लांबवली होती. त्यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. चोराचा शोध घेत असताना, पोलिसांना रेल्वेस्टेशनवर दोन संशयित आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन, चौकशी केली असता, त्यांनी चोरीची कबुली दिली. १ लाख रुपयांच्या दागिन्यांपैकी ६९ हजार १८६ रुपयांचा ऐवज पोलिसांनी यावेळी हस्तगत केला.