रत्नागिरी : मतदान करण्यासाठी रांगेत उभे असताना वयोवृद्ध मतदाराला हृद्य विकाराचा तीव्र झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. खेड तालुक्यातील सुकीवली येथे ही घटना घडली. महादेव चाळके(६४) असे त्यांचे नाव आहे. ते माजी सैनिक होते.
महादेव चाळके आज मतदानासाठी आपल्या सुकीवली गावातील मतदान केंद्रावर गेले होते. रांगेत उभे असताना त्यांना हृद्य विकाराचा झटका आला. त्यांच्या अकस्मात निधनाने चाळके यांच्या कुटुंबासह गावावर शोककळा पसरली.