रत्नागिरी दि.17:- जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर व लांजा तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. सदर निवडणूक कार्यक्रमानुसार मतदानाच्या दिवस म्हणजेच 21 डिसेंबर 2021 रोजी (सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत) हा कार्यालयीन दिवस असल्याने ग्रामपंचायतीच्या निवडणूका जेथे नियोजित आहेत तेथील मतदारांना मतदानाचा हक्क बजाविता यावा यासाठी जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी मंगळवार 21 डिसेंबर 2021 रोजी जिल्ह्यामध्ये मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर व लांजा तालुक्यातील पोट निवडणूकीचा कार्यक्रम लागू असलेल्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रापुरती मतदानाच्या दिवशी सुटी जाहीर केली आहे.















