मुंबई : मुंबई महापालिकेसाठी मंगळवारी २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी संबंधित निवडणूक क्षेत्रातील सर्व दुकाने, आस्थापना, निवासी उपहारगृहे, खाद्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना मधील कामगारांना मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भगपगारी सुट्टी जाहीर करण्याबाबत तसेच किमान दोन तासांची विशेष सवलत देण्याबाबत सूचना केली आहे. आयोगाच्या आदेशांचे पालन न केल्यास संबंधित आस्थापनांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल. मुंबईतील मतदारांनी निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.