मुंबई, 12 ऑगस्ट (निसार अली) : ससून डॉकजवळील समुद्रात आज बुधवारी मासेमारी करताना मोठा देवमासा जाळ्यात सापडला. देवमासा पाहण्यासाठी बघ्यांनी एकच गर्दी केली होती. माशाला क्रेनच्या सहाय्याने किनाऱ्यावर बोटीतून बाहेर काढण्यात आले.
त्याची लांबी जवळपास 25 फूट होती. जाळ्यातून बाहेर काढेपर्यंत मासा मृत झाला होता. ससून डॉकवर येथे व्यापाऱ्याने हा मासा जागेवरच
मोठी रक्कम देवून विकत घेतला. या माशाच्या विक्रीला मागणी व किंमत असते, अशी माहिती कोळी समाजाचे नेते दामोदर तांडेल यांनी दिली.