३१ जुलै पर्यंत यांत्रिक मच्छिमारीवर मत्स्यखात्यानं बंदी घातली आहे. या कालावधीत मासळीच्या जीवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्यांचे जतन होते. तसेच या कालावधीत खराब, वादळी हवामानामुळे होणारी मच्छिमारांची जिवीत व वित्तहानी मासेमारी बंदीमुळे टाळता येते. दरम्यान पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपारिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिक नौकांना लागू राहणार नाही. बिगर यांत्रिक बोट मासेमारीला खाडीपात्र हवामान शांत असताना किनाऱ्यालगत मासेमारी करता येऊ शकते. मासेमारी बंदीचा कालावधी १ जून ते ३१ जुलै असा एकूण ६१ दिवसांचा असणार आहे. दोन महिने मासेमारी बंद राहणार असल्याने समुद्रातील ट्रॉलर्स व मासेमारी नौका मच्छिमार बांधवानी किनाऱ्यावर आणून ठेवल्या आहेत.