
मुंबई, 9 नोव्हेंबर : मारवाडी युनिव्हर्सिटी या गुजरातमधील आघाडीच्या खाजगी संस्थेने क्यूएस आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग्ज २०२६ मध्ये ऐतिहासिक पदार्पण केले आहे, जेथे आपल्या पहिल्याच उपस्थितीत प्रभावी ३५३वा रँक मिळवला आहे. हे संपादन मारवाडी युनिव्हर्सिटीला क्यूएस रँकिंग्जमधील भारतातील अव्वल खाजगी युनिव्हर्सिटीजमध्ये स्थान देते, जो कोणत्याही भारतीय युनिव्हर्सिटीने आतापर्यंत संपादित केलेले सर्वोच्च पदार्पणीय रँक आहे.
या महत्त्वपूर्ण टप्प्यासह गुजरातमधील मारवाडी युनिव्हर्सिटी आता अधिकृतरित्या गुजरातमधील पहिल्या क्रमांकाची खाजगी युनिव्हर्सिटी आणि क्यूएस रँकिंग २०२६ मध्ये भारतातील सर्वोत्तम खाजगी युनिव्हर्सिटीजपैकी एक आहे. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्ज: आशिया २०२६ मध्ये मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी पदार्पणात ३५३वा रँक प्राप्त करणारी सर्वात नवीन खाजगी युनिव्हर्सिटी देखील आहे, ज्यामधून त्यांची शैक्षणिक व जागतिक उत्कृष्टतेची अभिमानास्पद ओळख दिसून येते.
क्यूएस क्वॉकेरेली सायमंड्सद्वारे दरवर्षाला प्रकाशित केले जाणारे क्यूएस आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग्ज आशियामधील सर्वोत्तम युनिव्हर्सिटीजना प्रकाशझोतात आणते. हे रँकिंग्ज शैक्षणिक व नियोक्ता प्रतिष्ठा, संशोधन कामगिरी, प्राध्यापक-ते-विद्यार्थी गुणोत्तर आणि आंतरराष्ट्रीय विविधता अशा निकषांवर आधारित संस्थांचे मूल्यांकन करतात, जेथे प्रदेशामधील विशिष्ट क्षमता आणि उच्च शिक्षणाच्या प्राधान्यक्रमांना दाखवतात.
मारवाडी युनिव्हर्सिटीने आंतरराष्ट्रीयीकरण आणि प्राध्यापकांच्या गुणवत्तेसाठी आशियामधील टॉप १०० मध्ये देखील स्थान मिळवले आहे, ज्यामधून त्यांची प्रबळ जागतिक सहयोग, वैविध्यपूर्ण विद्यार्थी समुदाय आणि शैक्षणिक उत्कृष्टतेप्रती कटिबद्धता दिसून येते. गुजरातचे प्रतिनिधीत्व करत मारवाडी युनिव्हर्सिटीचे क्यूएस आशिया रँकिंग २०२६ आता युनिव्हर्सिटीला आशियामधील सर्वात प्रतिष्ठित युनिव्हर्सिटीजमध्ये स्थान देते, जेथे इतर सर्वोत्तम संस्था देखील आहेत, जसे आयआयटी गांधीनगर (रँक ३००), अहमदाबाद युनिव्हर्सिटी, अहमदाबाद युनिव्हर्सिटी (रँक ८५१-९००), पीडीईयू (रँक ८५१-९००), पारूल युनिव्हर्सिटी (रँक १००१-११००) आणि एमएस युनिव्हर्सिटी (रँक ११००-१२००). यासह मारवाडी युनिव्हर्सिटी क्यूएस रँकिंग्ज २०२६ मध्ये असलेल्या गुजरातमधील काही युनिव्हर्सिटीजपैकी एक ठरली आहे.
मारवाडी युनिव्हर्सिटीचे प्रो वाइस-चान्सलर (प्रो-कुलगुरू) डॉ. संजीत सिंग म्हणाले, ”क्यूएस आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग्ज २०२६ मध्ये ३५३व्या रँकसह आमचे पदार्पण मारवाडी युनिव्हर्सिटीमधील प्रत्येकासाठी अभिमानास्पद क्षण आहे. या प्रतिष्ठित मान्यतेमधून आमचे विद्यार्थी, प्राध्यापकवर्ग आणि नेतृत्वाचा सहयोगात्मक उत्साह दिसून येतो, जे सतत उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करत आहेत. आमच्या पहिल्याच प्रयत्नामध्ये अशा उच्च स्थानावर रँकिंग्जमध्ये प्रवेश करण्यामधून नाविन्यता, सर्वसमावेशकता व जागतिक सहभागाच्या माध्यमातून शिक्षणामध्ये परिवर्तन घडवून आणण्याप्रती आमचा दृष्टिकोन दिसून येतो. हा महत्त्वपूर्ण टप्पा आम्हाला अधिक उंचीवर पोहोचण्यास आणि शैक्षणिक उत्कृष्टता व जागतिक प्रासंगिकतेचे प्रतीक असलेली युनिव्हर्सिटी घडवण्यास प्रेरित करतो.”














